सर्जेराव रामाराव पाटील-निमंत्रक
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती,सांगली.
यांचेकडून पूर परिस्थितीसाठी अभियंतांना समजपत्र.....
मा.हनुमंत गुणाले
मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग,पुणे.
कृष्णा नदी महापुराच्या बाबतीत सन 2023-24 चा महापूर बाबत तांत्रिक अहवाल मुख्यमंत्री यांना द्यावा...
महोदय,
सातत्याने येणारे कृष्णा महापूर 2005, 2006, 2019, 2021 आणि 2024 अलमट्टीने घेतलेली ताठर भूमिका आणि एकंदरीत कृष्णा नदीच्या महापुरास कारणीभूत ठरलेल्या उपाय योजने बाबत अंतरिम अहवाल जलसंपदा विभाग पुणे. यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री यांना लवकरात लवकर देण्यात यावा.
कृष्णा महापूर टाळण्यासाठी महापुरावरती उपाय योजना करण्याच्या बाबतीत कृष्णा महापूर समिती सातत्याने प्रयत्न करीत असून या प्रयत्नांना 2023-24 सलात महापुरात पुर नियंत्रित करण्यात मोठे यश मिळाले आहे. अलमट्टीने विसर्ग न केल्याने कृष्णा नदीत येणारी पाण्याची फुग पाहता, कोयना धरणातील परिचलन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने कोयना धरणातील विसर्ग थांबून कृष्णाकाठावारील लोकांना खरोखरच दिलासा दिला आहे.
एकात्मिक परिचलनावर लक्ष केंद्रित करत महापूर पासून सांगली कोल्हापूर याना वाचवले आहे. या वरून असे लक्षात येते की, गेलेल्या पुराच्या बाबतीत वास्तववादी एकात्मिक परिचलनाचा तंत्राचा अभ्यास व उपयोग केला असता सांगलीला येणारे महापुर टाळले जाऊ शकले असते, हे या अभ्यासानुसार लक्षात येते. 2024 च्या महापुरात अलमट्टीने घेतलेली भूमिका हव्यासापोटी सांगली कोल्हापुरास पुरात ढकलणारी होती. हा आडमुठेपानाच होता. यावरती सातत्याने महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी महापूर रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. व्हीसी च्या माध्यमातून व पत्र व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने अलमट्टीला पुढे विसर्ग वाढवण्याची विनंती वारंवार केली. परंतु ती विनंती केवीलवाणीच राहिली त्यावर कोणतेही प्रतिक्रिया देण्यास अलमट्टीने नकार दिला.व पाणी अडवणार अशीच भूमिका घेतली.
दरम्यानच्या काळात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी अलमट्टीला सूचना करणारे पत्र 15 दिवस आधी देऊन सुद्धा आणि महापूराच्या आधी पाणीपातळी बाबत घ्यावयाची काळजी हे त्यांना पत्रव्यवहार माध्यमातून करण्यात आला होता.
त्याच बरोबर सांगली पाठबंधारे यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न करून पत्रव्यवहार केला होता. त्याच बरोबर मा. मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, जलसंपदा विभाग पुणे. यांनी अलमट्टीशी संपर्क साधत तेथील डॅम परिचलन करणारे अधिकारी यांनाही संपर्क केला होता. तसा त्यांना विसर्ग करण्याबाबत सातत्याने पाठपुरावाही केला होता. याबाबत गुणाले यांच्याशी कृष्णा महापूर समिती निमंत्रक-सर्जेराव पाटील यांनी फोनवरून संपर्क करून पाठपुरावा करण्याची विनंती ही केली होती. त्या प्रमाणे अलमट्टीने गुणाले साहेब यांच्या बोलण्याला कोठेही प्रतिसाद देताना निदर्शनास आले नाही. मात्र पाण्याच्या हव्यासापोटी सांगलीकर पुन्हा पुरात बुडतात की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. नदीकाठाचे लोक भयभीत झाले होते. नद्या दुधड्या भरून वाहत होत्या. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत होता.
(2)
हवामान खात्याचा अंदाज कोठेही ढगफुटी होण्याची शक्यता होती. प्रसंग अतिशय भयानक वातावरणाचा होता सांगली पाण्याखाली जाण्याची शक्यतेने लोकांना हलवले होते. मात्र या प्रसंगातून कोयना धरण परिचलन करताना अतिशय काळजीपूर्वक व धरणातून विसर्ग न करता पाऊस कमी होण्याची वाट पाहत 102 टीएमसी पर्यंत धरण भरून घेतले, आणि या निर्णयामुळेच सांगली मधील पाणी चाळीस फुटापर्यंत स्थिर राहण्यास मदत झाली.१३ दिवस पाणी पातळी ४० फुटावर राखण्यास यश आले. अन्यथा 2019 च्या पुरा पेक्षा जास्त भयानक परीस्थिती २०२४ मध्ये निर्माण झाली होती.
आता मात्र अलमट्टी च्या या अडमुट्या भूमिकेबाबत त्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची पाळेमुळे उखडून टाकले आहेत, 517 मीटर पेक्षा जास्तीचा साठा त्यांनी केल्यामुळेच कृष्णा नदीचा पूर वाढत गेला पर्यायाने कोल्हापुरातील काही भाग तसेच शिरोळ या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.बंधारे,रस्ते,पूल पाण्याखाली गेले होते. सातत्याने यावरती पाठपुरावा करूनही अलमट्टी विसर्ग केला नाही. मात्र ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये धरणाची उंची केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वानुसार जर ठेवली असती, तर ही पूर परिस्थिती उद्भवली नसती भविष्यात अशा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारे विभाग जलसंपदा विभाग यांनी मा.मुख्यमंत्रींना महोदय,यांना याबाबत अहवाल देणे क्रमप्राप्त असून त्याबाबत कोणतीही भूमिका आज पर्यंत पाठबंधारे विभाग महाराष्ट्र यांनी घेतली नाही. याबाबत संशय बळावत आहे. तरी आता अलमट्टीच्या उंची वाढवण्याने पुन्हा नवीनच समस्या निर्माण होत असून ती उंची ५२४.२६८ करण्याच्या तयारीत कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत,तसे त्यानी बोलूनही दाखवले आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ठरविले असून या याचिकेला सपोर्टिव्ह अहवाल पाटबंधारे विभागाचा असणे गरजेचे असून त्याबाबत त्वरित पावले उचलून संबंधित विभागांना अलर्ट करून याचिका दाखल करणे गरजेचे आहे. तसेच या ५१५ मीटर पेक्षा जास्त पाणीसाठा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये करू नये या बाबत केंद्रीय जल आयोगा कडे जलसंपदा विभागाने पत्रव्यवहार करावा,तशी बैठक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन घ्यावी अशी विनंती कृष्णा महापूर समिती निमंत्रक - सर्जेराव पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
मा.सर्जेराव रामाराव पाटील-निमंत्रक
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती,सांगली.
मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.मुंबई.
मा.जिल्हाधिकारी,सांगली/कोल्हापूर
मा.अधीक्षक अभियंता,जलसंपदा मंडळ, सांगली/कोल्हापूर.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.