पोलीस पाटील दिनास जिल्हयातील पोलीस पाटलांचा सन्मान...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पोलीस पाटील दिनास जिल्हयातील पोलीस पाटलांचा सन्मान...



मा. भारत निवडणुक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहिता यांचे पालन करणेकामी अहोरात्र प्रयत्न करून सांगली जिल्हयातील सर्व मतदारसंघात दोन्ही निवडणूकांच्या मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रीया शांततेत व निर्भिड वातावरणात पार पडलेल्या आहेत.

दि.१७.१२.२०२४ हा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दल व महसुल प्रशासनाचे वतीने माहेश्वरी गार्डन, धामणी रोड विश्रामबाग येथे पोलीस पाटलांनी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने सांगली जिल्हयातील सर्व प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून आपण निवडणूक शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी याकरीता आचारसंहिता सुरू झाल्यापासून आपल्या गावातील सर्व राजकीय, सामाजिक घडामोडीवर बारकाईने लक्ष पुरवून वेळोवेळी स्थानिक पोलीसांशी संपर्क ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता आपले बहुमोल योगदान दिल्यामुळे त्यांचा मा. डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी सांगली, मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जिल्हयातील सर्व ६०४ पोलीस पाटीलांना सन्मानपत्र देवून गौरव केला.

पोलीस अधीक्षक, श्री. संदीप घुगे यांनी मार्गदर्शन करत असताना सर्व उपस्थितांचे आभार मानून पोलीस

पाटील यांना पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस पाटील हे गावातील मानाचे पद असून त्या पदास साजेल असे काम करावे, कायदा व सुव्यवस्था, क्लिष्ट गुन्हे यांच्या तपासात मदत करावी. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही अशाच प्रकारे चांगले काम करावे, महिला गुन्हयांबाबत कॉलेज, शाळा येथे जावून मार्गदर्शन करावे अशा सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी, डॉ. राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांचे स्वागत करून पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस पाटील ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली यंत्रणा असून आपण सर्वांनी ती चांगल्या प्रकारे ती अजुनही टिकवून ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील महत्त्वाच्या घटना आपल्या रजिस्टरमध्ये नमूद कराव्यात, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सर्व पोलीस पाटील यांनी सरकारी योजनेतून हेल्थ इन्श्युरन्स व लाईफ इन्शुरन्स करून घ्यावेत, असे आवाहन कलन सर्वांनी आपल्या कामाप्रति प्रामाणिक राहून कार्य करावे अशा सूचना दिल्या.

श्री. दादासाहेब चुडाप्पा, पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय यांनी सूत्र संचालन केले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रफुल्ल कदम जिल्हा विशेष शाखा, सांगली यांनी पोलीस पाटील यांचे अधिकार, कर्तव्ये व कार्यपध्दती याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक, सुधीर भालेराव, जिल्हा विशेष शाखा, सांगली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे शेवटी पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, श्री दादासाहेब चुडाप्पा यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. सदर कार्यक्रमास श्रीमती विमला एम, पोलीस उप अधिकारी, शहर विभाग, सांगली. उपस्थित होत्या, सदर पोलीस पाटील दिनास जिल्हयातील ६०४ पोलीस पाटील, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, मुख्यालय व जिल्हा विशेष शाखेकडील सर्व स्टाफ उपस्थित होता.