नांदणी येथे दि.1 ते 9 जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक पूजा आणि महामस्तकाभिषेकाचे आयोजन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नांदणी येथे दि.1 ते 9 जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक पूजा आणि महामस्तकाभिषेकाचे आयोजन...



नांदणी येथे दि.1 ते 9 जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक पूजा आणि महामस्तकाभिषेकाचे आयोजन..
पूजा महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पूज्य जिनसेन भट्टारकांचे आवाहन..



सांगली : नांदणी (ता.शिरोळ) येथील श्री वृषभाचल अतिशय क्षेत्रावर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळा दि.1 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केला आहे. ही पूजा फक्त नांदणीपुरती मर्यादीत नसून मठाच्या अधिपत्याखालील संपूर्ण 743 गावाची पूजा आहे. आपलीच पूजा मानून या पूजामहोत्सवासाठी श्रावक- श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केले.


दक्षिण भारत जैन सभेच्या जैन बोर्डिंगमधील स्व.लक्ष्मीबाई पाटील सभागृहामध्ये आयोजित दक्षिण भारत जैन सभा कार्यविस्तार व नांदणी पंचकल्याण पूजा निमंत्रण सभेत ते बोलत होते.
नांदणी येथे नूतन 21 फुट उंच भ.मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांची पद्मासन मूर्ती, बाजूला दाक्षिणात्य शिल्पकलेतील पांढऱ्या पाषाणातील जिनमंदिर (प्रथम शासनदेवी, चक्रेश्वर मंदिर) उभारले असून यामध्ये भ. आदिनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित होणार असून भ. आदिनाथ तीर्थंकर बृहन्मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.

द.भा.जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेची स्थापना, उद्देश आणि अलिकडील कार्याचा आढावा घेवून सभेने संस्कार, शिक्षण, आरोग्य आणि सेवेमध्ये स्थापनेपासून अविरतपणे कार्यरत आहे. जैन समाजाची प्रातिनिधी संस्था असलेल्या या संस्थेचे प्रत्येकानी सभासद व्हावे असे आवाहन केले. नांदणी येथील पूजेसाठी द.भा.जैन सभेच्यावतीने संपूर्ण सहयोग राहील. नांदणी पूजा महोत्सव समितीच्यावतीने हीरक कलश, सुवर्ण कलश, रजत कलश आणि रयत कलशांचे वितरण होत असून श्रावक-श्राविकांनी यातील कलश घेवून पुण्य संपादन करावे असे आवाहन श्री. रावसोब जि. पाटील यांनी केले.


सुरूवातील मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नांदणी मठाचे ट्रस्टी प्रा.आप्पासाहेब भगाटे यांनी मठ अणि पूजा महोत्सवातील सर्व कार्यक्रमाचे नियोजन व स्वरूप विषद केले. पूजा महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्री. सागर शंभूशेटे यांचेही मनोगत झाले. यावेळी व्यासपीठावर सभेचे सांगली विभागाचे उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले उपस्थित होते. वीर सेवा दलचे सेक्रेटरी श्री. अजित भंडे यांनी आभार मानले.


या बैठकीस सांगलीसह नांद्रे, समडोळी, दुधगाव, कुपवाड, माधवनगर, शिरगावकवठे गावातील मंदिर ट्रस्टी यांच्यासह शांतिनाथ नंदगावे, कमल मिणचे, अनिता पाटील, अंजली कोले, अरूणाताई पाटील, गीतांजली उपाध्ये, डॉ. नरेंद्र खाडे, ॲड.एस.पी.मगदूम, ॲड. कुबेर शेडबाळे, जिनेश्र्वर पाटील, बबन थोटे, अमोल पाटील, प्रशांत अवधूत, प्रकाश मगदूम, बाळासाहेब पल्लखे, रविंद्र खोत आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.