लोकसंदेश कवठेमहांकाळ प्रमुख: बाळासाहेब जाधव
उध्दव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी कवठेमहाकांळ तालुका शिवसेना महाविकास आघाडी धर्म पाळणार ; मारूती भाऊ पवार
कवठेमहाकांळ तालुक्यातील बोरगांव फाटा येथील मातोश्री मल्टीपर्पज हाॅल येथे महाविकास आघाडी पक्ष्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली होती या बैठकनंतर वैयक्तिकरीत्या कवठेमहाकांळ तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत कवठेमहाकांळ-तासगांव मतदारसंघात विधानसभेबाबात मुख्य विषयासहीत विविध विषयांवर चर्चासत्र संपन्न झाले असून सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते याच्या उपस्थित कवठेमहाकांळ तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक याचे महाविकास आघाडी धर्म पाळणार असे एकमत झाले असून महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार रोहित पाटील याच्या तुतारी चिन्हांचा प्रचार करणार आहो असा शिक्कामोर्तब करत एकच निर्धार व्यक्त करण्यात आला .
या बैठकी नंतर कवठेमहाकांळ शिवसेना तालुकाप्रमुख मारूतीभाऊ पवार यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे याचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक खंबीर असून उध्दव बाळासाहेब ठाकरे याच्या आदेशानुसार रोहित पाटील याच्या प्रचारार्थ कवठेमहाकांळ तालुका विधानसभा निवडणुक मैदानात उतरत आहे, महाविकास आघाडी धर्म पाहण्याचे त्यानी खरे कारण स्पष्ट केले की ते म्हणाले उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले पाहण्यासाठी महाविकास आघाडी धर्माचे पालन प्रत्येक शिवसैनिक शेवटच्या क्षणापर्यंत करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.
रोहित पाटील याच्या राष्ट्रवादी शरद पवार गटा पेक्षा उध्दव बाळासाहेब ठाकरे याची शिवसेना त्याचा प्रचार जोमाने करेल व त्याना प्रचंड बहुमताने निवडून आणेल असे कवठेमहाकांळ शिवसेना तालुकाप्रमुख मारूतीभाऊ पवार प्रतिपादन केले आहे.
यावेळेस मारूतीभाऊ पवार याच्या सोबत कवठेमहाकांळ तालुका शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल बाबर, सांगली जिल्हा उपप्रमुख संजय काका चव्हाण, कवठेमहाकांळ-तासगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल पाटील, सांगली शिवशक्ती वाहतूक सेना जिल्हाप्रमुख सागर शेजाळ, कवठेमहाकांळ शिवसेना उपतालुकाप्रमुख दिलीप गिड्डे , राजाभाऊ घाडगे,एकनाथ पवार, अनिल शिंदे, कवठेमहाकांळ युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण चव्हाण, युवा सेना नेते रोहित पाटील, कवठेमहाकांळ शिवसेना शहरप्रमुख परशुराम करांडे, मोहन माने ,बंडू पाटील, बोरगांव विकास सोसायटी संचालक उत्तम सुर्यवंशी, मंहमंद तांबोळी,मधुकर मंडले,संभाजी चव्हाण अजय मोरे , विजय जाधव , युवा सेना नेते शरद पवार, रामचंद्र नाईक, प्रदिप पाटील, ब्रिजमोहन पाटील बाबूराव मंडले , दिलीप झुरे,आनदा झुरे , विशाल पाटील, सागर परिट, तानाजी खांडेकर, पोपट पवार पाडुरंग जाधव,शिवसैनिक प्रमुख उपस्थित होते..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,/ सांगली.