लोकसंदेश न्यूज कोल्हापूर
सतेज पाटील यांच्या सात्विक संतापात गैर काय ?
24 तास पक्षासाठी झटणाऱ्या नेत्याचे वक्तव्य ही उस्फुर्त प्रतिक्रिया
===========
महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विश्वासात न घेता खासदार शाहू महाराज यांनी मधुरिमा राजे यांना विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला यावर सात्विक संताप व्यक्त केला.
त्यात वावगे आणि चुकीचे काहीच नाही .
सतेज पाटील जिल्हाभर गेले काही दिवस पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
उमेदवारी अर्ज भरणे, काही बंडखोरांची मनधरणी करून अर्ज मागे घ्यायला प्रयत्न करणे, अशा सगळ्या परिस्थितीत सतेज पाटील एक हाती दगदग आणि धावपळ करत आहेत.
वडणगे येथे राहुल पीएन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम सुरू असताना बंटी पाटील वेगवेगळ्या मतदार संघातील बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या प्रयत्नात होते.
तेथील सभा संपल्यानंतर खासदार शाहू महाराज थेट कलेक्टर ऑफिसला जाऊन पोहोचले.
दरम्यान मालोजीराजे आणि मधुरीमाराजे तेथे पोहोचले.
महाराजांनी त्यांना अर्ज माघारीवर सही करण्यास सांगितले .या घडामोडी सतेज पाटील यांना माहिती नव्हत्या .
ते राजेश लाटकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या माघारीच्या प्रतीक्षेत होते.
त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील या घडामोडी समजल्यानंतर ते तडक तेथे पोहोचले .
तोपर्यंत मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता
*साहजिकच कुणाही नेत्याला आपल्याला अंधारात ठेवून अशा काही घडामोडी होत असतील तर राग येणे साहजिक आहे*
बंटी पाटील जिल्हाभर महाविकास आघाडीचे उमेदवार यशस्वी व्हावेत, म्हणून धावपळ करत आहेत आणि गेले काही दिवस एक विशिष्ट यंत्रणा एका विशिष्ट ठिकाणाहून काम करत आहे .
पहिल्यांदा राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती उमेदवारी बदलावी लागेल असा अट्टाहास काही नेतेमंडळींनी बंटी पाटील यांच्याकडे धरला आणि त्या ठिकाणी मधुरिमा राजे यांची उमेदवारी घोषित करायला भाग पाडले .
दुसऱ्या दिवशी मधूरीमा राजे यांनी ऋतुराज पाटील आणि राहुल पाटील यांच्यासोबत मिरवणुकीने जाऊन आपला विधानसभा उमेदवारी अर्ज भरला.प्रचाराला सुरुवात केली.
तिकडे राजेश लाटकर यांची नाराजी समोर आली आणि त्यांनी आपली उमेदवारी बदलण्यात एक षडयंत्र घडले आहे, असा जाहीर आरोप केला.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राजेश लाटकर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतील, अशी सर्व परिस्थिती असताना राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले आणि दुसरीकडे अर्ज मागे घेण्यास काही मिनिटे असताना छत्रपती शाहू महाराज मालोजीराजे आणि मधुरीमाराजे यांनी जाऊन मधुरिमा राजे यांचा अर्ज मागे घेतला.
या सर्व घडामोडी मध्ये कोल्हापूरच्या सामान्य जनतेला हसावे की रडावे हेच कळेना
*बंटी पाटील यांनी याविषयी महाराजांच्याकडे नाराजी व्यक्त केली आणि हे सगळं प्रकरण पेटवलेल्या कार्यकर्त्यांना दम भरला. यामध्ये बंटी पाटील यांची अजिबात चूक नाही..
कारण ही तळ्यात मळ्यात परिस्थिती कुणाही नेत्याला क्लेशदायक आहे .
त्याच विचारातून त्यांनी ही बाब आपल्याला आवडली नसल्याचे विधान केले आहे.
*त्याचा अर्थ असा की मधुरिमा राजे यांनी घेतलेला निर्णय कुणालाच रुचलेला नाही*.
त्यांनी जर उमेदवारी लढवायची नव्हती तर मिरवणुकीने जाऊन फॉर्म भरायचा नव्हता.
आता बंटी पाटील यांनी महाराजांवर आग पाखड केली असा कांगावा विरोधक करायला लागतील
त्यामध्ये काहीही अर्थ नाही जनतेने झालेला प्रकार माध्यमांच्या क्लिपिंग मधून पाहिलेला आहे आणि तो नेमका काय प्रकार घडला हे समजेपर्यंत यामध्ये बंटी पाटील पूर्णपणे निर्दोश आहेत याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही
डॉ. सुनील बी पाटील
मोबा 94 220 49 405
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / कोल्हापूर