कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी माझा पाठपुरावा राहील सुधीरदादा गाडगीळ; वकील संघटनेबरोबर चर्चा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी माझा पाठपुरावा राहील सुधीरदादा गाडगीळ; वकील संघटनेबरोबर चर्चा



कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी माझा पाठपुरावा राहील

सुधीरदादा गाडगीळ; वकील संघटनेबरोबर चर्चा

सांगली, दि.१७: मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून ती प्रत्यक्षात यावी यासाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीन,अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. सांगली वकील  संघटनेच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली शहर तसेच मतदारसंघ अत्याधुनिक, सुसज्ज आणि समृद्ध व्हावा. येथे सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. क्रीडा क्षेत्र अधिकाधिक विकसित व्हावे असे माझे स्वप्न आहे. त्या दृष्टीने मी काम करीत आहे. गेल्या दहा वर्षात आपण काही पायाभूत सुविधा येथे निर्माण केल्या आहेत. यापुढे आपल्याला अधिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
ते म्हणाले, सांगलीतील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तसेच मैदानी खेळासाठी व्यवस्था मला करायची आहे. त्यासाठी मी निधीसुद्धा मंजूर करून आणला आहे.सांगलीत बॅडमिंटन कोर्ट उभे करायचे आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलही मी उभे करणार आहे.


ते म्हणाले, वकिलांच्या कोणत्याही समस्या मला तुम्ही सांगा मी त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करीन.
संघटनेचे उपाध्यक्ष विजय गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. ज्येष्ठ विधीज्ञ एस.टी. जाधव,वकील संघटनेचे सचिव अमोल पाटील, महिला सचिव पल्लवी कांते, माजी अध्यक्ष प्रताप हारुगडे, योगेश कुलकर्णी, सर्जेराव मोहिते, गोपाळ माईंणकर, विक्रम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वकील  उपस्थित होते.
.....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.