विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले...



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :
मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले

सांगली, दि. 16 : जिल्ह्यात ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने या दोन्ही दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास अशा एकूण 123 गावातील आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पारित केले आहेत.

जिल्ह्यात ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 123 गावात आठवडा बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट 1862 (सन 1862 चा मुंबई कायदा क्रमांक 4) च्या कलम 5 व 5अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.

अ.क्र तालुका गावाचे नाव आठवडा बाजाराचा वार

1 मिरज संजयनगर, सांगली बुधवार
2 मिरज बुधगाव बुधवार
3 मिरज कुपवाड-2 बुधवार
4 मिरज माधवनगर शनिवार
5 मिरज कर्नाळ शनिवार
6 मिरज समडोळी बुधवार
7 मिरज वान्लेसवाडी बुधवार
8 मिरज मिरज बुधवार, शनिवार
9 मिरज शिवाजीनगर बुधवार, शनिवार
10 मिरज वखरभाग मिरज बुधवार, शनिवार
11 मिरज वड्डी शनिवार
12 मिरज बोलवाड बुधवार
13 मिरज शिपूर बुधवार
14 मिरज एरंडोली शनिवार
15 मिरज खटाव बुधवार
16 मिरज शिंदेवाडी बुधवार
17 मिरज नरवाड शनिवार
18 मिरज कवलापूर बुधवार
19 मिरज कांचनपूर बुधवार
20 मिरज कानडवाडी बुधवार
21 मिरज करोली एम शनिवार
22 मिरज सिध्देवाडी शनिवार
23 खानापूर-विटा भिकवडी बू. बुधवार
24 खानापूर-विटा लेंगरे शनिवार
25 खानापूर-विटा देवखिंडी बुधवार
26 खानापूर-विटा बलवडी भा. शनिवार
27 खानापूर-विटा माहूली बुधवार
28 खानापूर-विटा चिखलहोळ शनिवार
29 खानापूर-विटा करंजे बुधवार
30 खानापूर-विटा पारे बुधवार
31 खानापूर-विटा ऐनवाडी बुधवार
32 खानापूर-विटा हिंगणगादे बुधवार
33 खानापूर-विटा बामणी शनिवार
34 खानापूर-विटा कार्वे शनिवार
35 तासगाव बोरगांव बुधवार
36 तासगाव हातनूर बुधवार
37 तासगाव बलगवडे बुधवार
38 तासगाव चिंचणी शनिवार
39 तासगाव सावळज शनिवार
40 तासगाव डोंगरसोनी बुधवार
41 तासगाव जरंडी बुधवार
42 तासगाव मणेराजुरी बुधवार
43 तासगाव येळावी बुधवार
44 तासगाव तुरची शनिवार
45 तासगाव राजापूर शनिवार
46 तासगाव ढवळी बुधवार
47 तासगाव खा.धामणी बुधवार
48 कवठेमहांकाळ रांजणी शनिवार
49 कवठेमहांकाळ कूची शनिवार
50 कवठेमहांकाळ आगळगाव शनिवार
51 कवठेमहांकाळ चोरोची बुधवार
52 कवठेमहांकाळ कोकळे बुधवार
53 शिराळा मांगले बुधवार
54 शिराळा कोकरूड बुधवार
55 शिराळा तळवडे बुधवार
56 शिराळा पुनवत बुधवार
57 शिराळा आरळा शनिवार
58 शिराळा कांदे शनिवार
59 आटपाडी आवळाई बुधवार
60 आटपाडी घरनिकी बुधवार
61 आटपाडी आटपाडी शनिवार
62 वाळवा बागणी बुधवार
63 वाळवा कासेगाव बुधवार
64 वाळवा कुरळुप बुधवार
65 वाळवा पेठ बुधवार
66 वाळवा गोटखिंडी बुधवार
67 वाळवा नवेखेड बुधवार
68 वाळवा रेठरेहरणाक्ष बुधवार
69 वाळवा इटकरे बुधवार
70 वाळवा कारंदवाडी बुधवार
71 वाळवा पडवळवाडी बुधवार
72 वाळवा बहे बुधवार
73 वाळवा वाटेगाव शनिवार
74 वाळवा येलूर शनिवार
75 वाळवा महादेववाडी शनिवार
76 वाळवा काकाचीवाडी शनिवार
77 वाळवा बावची शनिवार
78 वाळवा ढवळी शनिवार
79 वाळवा तुजारपूर शनिवार
80 वाळवा मालेवाडी शनिवार
81 वाळवा ढगेवाडी शनिवार
82 वाळवा येलूर शनिवार
83 कडेगाव आसद बुधवार
84 कडेगाव देवराष्ट्रे बुधवार
85 कडेगाव हिंगणगाव (खुर्द) शनिवार
86 कडेगाव मोहिते वडगाव शनिवार
87 कडेगाव नेर्ली बुधवार
88 कडेगाव नेवरी शनिवार
89 कडेगाव सोनकिरे बुधवार
90 कडेगाव सोनसळ शनिवार
91 कडेगाव तोंडोली शनिवार
92 कडेगाव वडियेरायबाग बुधवार
93 कडेगाव विहापूर बुधवार
94 कडेगाव येडे शनिवार
95 पलूस माळवाडी बुधवार
96 पलूस अंकलखोप बुधवार
97 पलूस सुर्यगाव शनिवार
98 पलूस पलूस शनिवार
99 पलूस आंधळी शनिवार
100 पलूस सावंतपूर शनिवार
101 पलूस पुणदी शनिवार
102 पलूस दुधोंडी बुधवार
103 जत गुगवाड बुधवार
104 जत सिंदूर शनिवार
105 जत उमराणी शनिवार
106 जत मेंढेगिरी शनिवार
107 जत बाज शनिवार
108 जत येळवी शनिवार
109 जत वायफळ बुधवार
110 जत वाळेखिंडी शनिवार
111 जत कोसारी बुधवार
112 जत धावडवडी बुधवार
113 जत हिवरे शनिवार
114 जत मुचंडी बुधवार
115 जत उंटवाडी बुधवार
116 जत सनमडी बुधवार
117 जत दरीकोणूर बुधवार
118 जत तिकोंडी शनिवार
119 जत मोरबगी शनिवार
120 जत भिवर्गी बुधवार
121 जत आसंगी जत बुधवार
122 जत सोन्याळ बुधवार
123 जत आसंगी तुर्क बुधवार

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.
___________________________________________________
बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत...
"महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज" सांगली,  सर्व कार साठी ,सर्व ॲक्सेसरीजची शृंखला.. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ,ऑनलाईन  "कॅश ऑन डिलिव्हरी"ची सुविधा.. ...

         नवीन उद्योग करणाऱ्याना सुवर्णसंधी..
. या व्यवसायाची फ्रॅंचाईसी घेऊन छोट्या भांडवलात... मोठा नफा मिळवू शकता..  
अधिक माहितीसाठी..
संपर्क: 9850516355.....
751 751 1185

________________________________________________