लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जागतिक ह्दय दिनानिमित्त
मिरजेतील आर्यन हार्ट केअरच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन...
:- पर्यावरण जपण्यासाठी आणि लोकांना व्यायामाचे महत्व कळावे यासाठी आर्यन हार्ट केअरच्या वतीने जागतिक ह्दय दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालय येथून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या हस्ते सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ रियाज उमर मुजावर, डॉ शबाना रियाज मुजावर, आयएमएचे अध्यक्ष रविकांत पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी,डॉ अमित जोशी, डॉ सुरेश पाटील ,डॉ गणेश चौगुले महापालिका आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक माधव बेटगीरी ,उपस्थित होते. विश्रामबाग येथून सदरची रॅली ही सांगली मिरज रस्त्यावरून मिरजेतील गांधी चौक या ठिकाणी येऊन परत सदर रॅली विश्रामबाग या ठिकाणी समाप्त करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी स्वतः संपूर्ण रॅलीत सायकल चालवत पर्यावरण व व्यायामाचे महत्त्व लोकांना सांगितले सदर रॅलीचे आयोजन आर्यन हार्ट केअर सांगली साइक्लोथॉन व मिरज मॉर्निंग ग्रुप मिरज ,आयएमए मिरज ,परमशेट्टी चारिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ मिरज,यांच्यावतीने करण्यात आले होते या रॅलीमध्ये मिरजेतील मॉर्निंग ग्रुप सांगली सायक्लोथॉन, एस 3 ग्रुप,अँबिशियश ग्रुप सांगली, सांगली मॅरोथॉन,भारती मॅरोथॉन,ऍक्टिव्ह सायकल ग्रुप सांगली ,भारती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यासह अनेक सायकल खेळाडूंनी सहभाग घेतला. आर्यन हार्ट केअर चे प्रमुख डॉक्टर रियाज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मॉर्निंग ग्रुपचे अतिश अग्रवाल ,उस्मान,बाणदार,अरुण लोंढ़े रविकांत अटक ,गणेश कोळसे,संतोष शिंदे,सतीश भोरे,संतोष बुवा ,प्रभात हेटकाळे,मंदार वसगडेकर, रवींद्र फडके,मुकुंद कंकनी , लक्ष्मण अंबी यांच्यासह मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.