ग्रामीण भागात जैनांचे अस्तित्व टिकवण्यात कासार समाजाचे योगदान रावसाहेब पाटील : जैन कासार समाजाचे अधिवेशन यशस्वी...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागात जैनांचे अस्तित्व टिकवण्यात कासार समाजाचे योगदान रावसाहेब पाटील : जैन कासार समाजाचे अधिवेशन यशस्वी...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

ग्रामीण भागात जैनांचे अस्तित्व टिकवण्यात कासार समाजाचे योगदान रावसाहेब पाटील : जैन कासार समाजाचे अधिवेशन यशस्वी

सांगली: जैन कासार समाज हा मुख्यत्त्वे ग्रामीण भागातील प्रत्येक मुख्य शहरात आहे. आज दक्षिण भारत सभाही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकली नाही. परंतु शेती, बांगडी, भांडी व्यवसायाबरोबरच नोकरीतही जैन कासार समाज पुढे आहे. जैन कासार समाजाने ग्रामीण भागात जैनत्वाचे खरे अस्तित्व टिकविले आहे. जैन कासार संस्थाही दक्षिण भारत सभेशी जोडलेली आहे. तुमच्या सहकार्याने आता सकल जैन समाजाला बळकटी येणार आहे, असे गौरवोद्रार दक्षिण भारत जैन समेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी काढले. ते दिगंबर जैन कासार समाजाच्या सातव्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन कासार संस्थेचे अध्यक्ष विजयअण्णा कासार होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने तज्ञ संचालक डी.ए. पाटील, कोल्हापूर रिजनचे चीफ इंजिनिअर स्वप्नील काटकर, सन्मती सेवादलाचे संस्थापक जीवनदादा पाटील उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले, सचिव अजित मोहिरे, सागर घोंगडे, कार्याध्यक्ष महावीर दुरुगकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दिगंबर जैन कासार समाजाचे सातवे अधिवेशन सांगली येथे वरद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाले. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितली. डोलें म्हणाले, जैन कासार समाजाला या संघटनेने एका सुत्रात बांधले आहे. एक संघटनशक्ती आज मोठ्या कष्टाने उभी राहिली आहे. धार्मिक अधिष्ठान व पारदर्शक व्यवहार याच्या बळावर संस्था प्रगतीपथावर आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जैन समाज या संस्थेशी जोडला असून विविध प्रश्नांवर या

डी.ए. पाटील म्हणाले, जैन कासार समाजाचे कोकणामध्ये फार पूर्वीपासून काम सुरू आहे. डोलें व विजयअण्णा यांनी याला राज्यभर विस्तार करून सर्व समाजाला एकत्रित केले आहे. जैन कासार समाचार या मासिकामुळेच सर्वापर्यंत तुम्हाला पोहोचता आले. हे मासिक समाजाच्या उत्कर्षासाठी आवयश्यक आहे. यामुळेच जैन कासार संस्थेला आता अखिल भारतीय जैन उपजाती महासंघाचे सदस्यत्व मिळाले आहे. त्यामुळे आता विचारांचे आदान-प्रदान, मागर्दशन आता मिळणार आहे. प्रत्येक उपजातीने आपल्या समाजासाठी काम केले पाहिजे. त्यातून सकल जैन समाजाला बळकटी येणार आहे. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सागर धोंगडे यांनी केले. कार्याध्यक्ष महाबीर दुरुगकर (सोलापूर) यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे मार्गदर्शक जीवनदादा पाटील यांनीही नवीन पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न आवश्यक असून यापुढे धर्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यातचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष विजयअण्णा कासार म्हणाले, मासिकामुळे सर्वापर्यंत पोहोचता आले आहे. त्या माध्यमातून समाज

बांधवांच्या असणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी अशा अधिवेशनातून मार्ग सापडणार आहे. जैन कासार समाजातील एकही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून दूर राहणार नाही यासाठी संस्था प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासाठी संस्था एक कोटी रुपयांचा शिक्षणनिधी उभा करीत असून अनेक समाज बांधव यासाठी हातभार लावीत आहेत. तसेच आर्थिक अडचणीमुळे मासिक बंद पडू यासाठी संवर्धन निधी उभारण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.

अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले. तसेच महिला कल्याण समितीच्या वतीने 'विवाह जुळवताना' या ज्वलंत विषयावर परिसंवाद घेतला. यात अध्यक्षा ड. प्रभा मांगले, ड.नीता मंकणी (सोलापूर), डॉ. केतकी धने (रत्नागिरी), अरुणा मांगले (मुंबई) यांनी वेगवेगळ्या विषयावर उपस्थित बधू-वर व समाजाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष दगडे यांनी तर आभार सचिव अजित मोहिरे (रत्नागिरी) यांनी मांडले.

अधिवेशनास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे व कर्नाटकातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.