लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
अंजुमभाई नदाफ
आपले फॉर्म हज कमिटी मुंबई येथे तारीख 23/ 10/ 2024 पर्यंत पोहोच करावयाचे आहेत. याची सर्व हज यात्रेकरूनीं नोंद घ्यावी.
"खिदमत हुज्जाज कमिटी, शंभर फुटी रोड सांगली
अल्पसंख्यांक मंत्रालय भारत सरकार,दिल्ली व हज कमिटी ऑफ इंडिया यांचे वतीने पवित्र हज यात्रा 2025 साठी दिल्ली येथे आज यात्रेकरूंच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातून एकूण 23395 इच्छुकांनी आपले ऑनलाइन हज फॉर्म भरले होते, व महाराष्ट्रासाठी भारत सरकारकडून 9,165 हज यात्रेकरूंना संधी मिळाली आहे.
सांगली जिल्ह्यातून जनरल कोट्यातून (308 )व वरिष्ठ नागरिक कोट्यातून (42) व लेडीज बिगर मेहरम कोट्यातून (6) इच्छुक हज यात्रे करुनी असे एकूण 356 अर्ज सांगली जिल्ह्यातून दाखल झाले होते. दाखल झालेल्या अर्जातून सांगली जिल्ह्याला 268 इतक्या हजयात्रे करूना मंजुरी मिळाली.
निवड झालेल्या हज यात्रेकरूंनी दिनांक 21 /10/ 2024 किंवा त्यापूर्वी प्रत्येकी एक लाख तीस हजार तीनशे मात्र प्रत्येकी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत हज कमिटीच्या दिलेल्या नमुना स्लिप वरून कोर बँकिंग ने रोखीने रक्कम भरण्याची आहे आपण नेट बँकिंगने सुद्धा रक्कम भरू शकता, तसेच हज कमिटीच्या दिलेल्या नमुन्याप्रमाणे प्रत्येकाचा मेडिकल व स्क्रीनिंग दाखला सरकारी दवाखान्यातून घ्यावयाचा आहे. या सर्व कागदपत्राची पूर्तता करून महाराष्ट्र राज्य हज समिती, मुंबई येथे तारीख 23 /10/ 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वी आपले अर्ज जमा करावयाचे आहेत.
जमा करावयाची कागदपत्रे---
(१) आपण ऑनलाइन भरलेला आपला अर्ज प्रतिज्ञापत्र व पासपोर्ट प्रतिज्ञापत्रा सह सर्व कागदपत्रावर अर्जदार, नॉमिनी, व स्त्री उमेदवारांच्या अर्जावर मेहरमची सही करून अर्ज पूर्ण करावयाचा आहे प्रत्येकाच्या अर्जावर फोटोच्या जागी व्हाईट बॅकग्राऊंड फ्रंट पोज कलर फोटो चिटकवण्याचा आहे व सोबत पासपोर्ट झेरॉक्स आधार कार्ड व पॅन कार्ड व बँकेचा रद्द केलेला चेक किंवा पासबुकची झेरॉक्स जोडाव्याचे आहे प्रत्येक झेरॉक्स वर आपापली सही करावयाचीआहे
(२) सरकारी दवाखान्यातून हज कमिटीच्या नमुन्याप्रमाणे घेतलेले प्रमाणपत्र
(३) बँकेत पहिला हप्ता भरलेल्या रकमेचे चलन.
(४) पासपोर्टच्या दोन झेरॉक्स प्रति व त्यावर आपलीं सही
(५) व्हाईट बॅकग्राऊंड फ्रंट पोज (प्रत्येकाचे कान दिसणे आवश्यक) प्रत्येकी दोन फोटो
या सर्व कागदपत्रासह आपले फॉर्म हज कमिटी मुंबई येथे तारीख 23/ 10/ 2024 पर्यंत पोहोच करावयाचे आहेत. याची सर्व हज यात्रेकरूनीं नोंद घ्यावी.
"खिदमत हुज्जाज कमिटी, शंभर फुटी रोड सांगली" या कार्यालयातून दरवर्षीप्रमाणे हज यात्रे करूच्या सोयीसाठी मुंबई हज कमिटी कडे अर्ज पाठवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व हजयात्रेकरूनीं या संधीचा लाभ घ्यावा व आपली सेवा करण्याची आम्हास संधी द्यावी असे आवाहन हाजी मुनीर आत्तार व त्यांच्या सहकार्याकडून करण्यात येत आहे.
दुवा मे याद करें !!!
सभी हजियोंको हज मुबारक हो... अल्लाह तआला आपके हज को कबूल करें.. (आमिन) आप हमारे सभी कुंभे के लिये भी दुवा करे...
संपादक; सलीम नदाफ .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.