पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी महत्वपूर्ण पुणे-हुबळी वंदेभारत एक्सप्रेस वाया सांगली, बेळगाव सुरू होणार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी महत्वपूर्ण पुणे-हुबळी वंदेभारत एक्सप्रेस वाया सांगली, बेळगाव सुरू होणार...


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी महत्वपूर्ण पुणे-हुबळी वंदेभारत एक्सप्रेस वाया सांगली, बेळगाव सुरू होणार...

भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्य्क्ष श्री कैलासजी वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वेगवान वंदेभारत रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी रेल मंत्रीकडे केली होती. भाजपाचे तत्कालीन खासदार संजयकाका पाटील यांनी देखील रेल मंत्री अश्विनी वैष्णव व रेल राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची 2023 व 2024 मध्ये अनेकवेळा भेट घेऊन पुणे-हुबळी वंदे भारत गाडी सुरू करुन सांगली व मिरज येथे वंदेभारतला थांबा देण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी देखील पश्चिम महाराष्ट्रातील सांगली स्टेशनवर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती केली होती.


या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी-सांगली-पुणे मार्गावर गाडी क्र 20669 हुबळी-पुणे वंदेभारत व गाडी क्र 20670 पुणे-हुबळी वंदेभारत वाया सांगली बेळगाव मंजूर केली आहे.

गाडी क्र 20669 हुबळी-पुणे वंदेभारत वाया बेळगाव, सांगली..

हुबळी सकाळी 5 सुटेल
धारवाड सकाळी 5:17
बेळगाव सकाळी 7
मिरज सकाळी 9:20
सांगली सकाळी 9:30
सातारा सकाळी 10:30
पुणे दुपारी 1:30 वा

गाडी क्र 20670 पुणे-हुबळी वंदेभारत वाया सांगली, बेळगाव

पुणे दुपारी 2:15 सुटेल
सातारा दुपारी 4:10
सांगली संध्याकाळी 6:10
मिरज संध्याकाळी 6:45
बेळगाव संध्याकाळी 8:35
धारवाड रात्री 10:20
हुबळी रात्री 10:45

         ठळक वैषिष्ठ्ये

8 कोचची संपूर्ण एसी वातानुकूल वंदे भारत गाडी
सोमवार सोडून रोज धावेल
गती - 66 किमी प्रती तास
अंतर 558 किमी


*थांबे* : पुणे ते हुबळी दरम्यान सातारा, सांगली, मिरज, बेळगाव व धारवाड हे 5 थांबे असतील

*वंदे भारतची प्रमुख शहरातील प्रवास वेळ*
पुणे ते सांगली स्टेशन - 3 तास 55 मिनिट
सांगली स्टेशन ते बेळगाव - 2 तास 23 मिनिट
सांगली स्टेशन ते हुबळी - 4 तास 33 मिनिट
बेळगाव ते हुबळी - 2 तास 10 मिनिट
पुणे ते हुबळी - 8 तास 30 मिनिट..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.