भुईंज येथे जानेवारी २०२१ मध्ये घडलेल्या ओंकार चव्हाण खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भुईंज येथे जानेवारी २०२१ मध्ये घडलेल्या ओंकार चव्हाण खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

 


ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख

दी -26

मोक्का प्रकरणातील एका आरोपीस जामीन मंजूर

भुईंज येथे जानेवारी २०२१ मध्ये घडलेल्या ओंकार चव्हाण खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर


दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत इसम नामे ओंकार चव्हाण यास जीवे ठार मारुन त्याची बॉडी भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. 

सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित आरोपी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव सह एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली होती. 

तदनंतर सदर प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अटक असलेला १३ नंबर चा आरोपी म्हणजेच शुभम जाधव याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जदार / संशयित आरोपी नामे शुभम जाधव हा घटनास्थळी हजर असल्याबाबत तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांस मारहाण केल्या बाबत आरोप त्याच्यावर होते. सदर आरोपीस तपासादरम्यान झालेल्या ओळखपरेड (TIP) मध्ये साक्षीदारांनी ओळखले नसून कोणतेही सुसंगत पुरावे आरोपीच्या विरोधात नाहीत , तसेच FIR मध्ये देखील अर्जदार शुभम याचे नाव नाही असा युक्तिवाद संशयित आरोपीच्या वतीने करण्यात आला.

आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने अटी व शर्तींवर आरोपीस जामीन मंजूर केला असून संशयित आरोपीच्या वतीने ॲड. शैलेश धनंजय चव्हाण , ॲड. प्रथमेश अनिल बनकर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.


लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

7709504356