श्री गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी आढावा बैठक सपन्न एक खडकी योजनेचा जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी लाभ घ्यावा... - आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्री गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी आढावा बैठक सपन्न एक खडकी योजनेचा जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी लाभ घ्यावा... - आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

श्री गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी आढावा बैठक सपन्न

एक खडकी योजनेचा जास्तीत जास्त गणेशोत्सव  मंडळांनी लाभ घ्यावा...
  - आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन..


आज स्थायी समिती सभागृह मध्ये  आगामी  गणेशोत्सव  आनंदी वातावरणात साजरा  करता यावा यासाठी मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मार्फत घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती आगमनाच्या व विसर्जनाच्या मार्गावर व्यवस्था चागला प्रकारे  करण्यात येत आहे त्याच  बरोबर सर्व प्रभाग समिती मध्ये एक खिडकी व्यवस्था सुरू करणेत आलेली असून त्यामध्ये
महापालिका कर्मचारी आणि  स्थानिक पोलीस प्रतिनिधी व इतर विभागांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त श्री गणेश  मंडळांनी एक खिडकीच्या माध्यमातून परवानगी घेऊन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.



  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुख यांच्या बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता महत्वाच्या   सूचना  दिल्या आहेत,
त्या मध्ये  रस्त्यावर खड्डे भरणे, मंजूर असलेले रस्ते त्वरित सुरू करणे, डीएलपी मधील रस्त्याबाबत कंत्राटदाराकडूनच  दुरुस्ती करून घेण्याची आहे  तसेच श्री  गणपती असणाऱ्या सर्व गल्ल्यांमधील व भागातील खड्डे भरून घेणे बाबत बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. ड्रेनेज लाईनचे काम चालू  आहे त्या भागात रेस्टोरेशन नुसार काम करून घेण्याचे आहे .
उत्सवाच्या कालावधी मध्ये सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत राहील याची व्यवस्था करण्या बाबत स्पष्ठ सुचना दिलेल्या आहेत. काही भागात  अपुरा पाणी पुरवठा झाल्यास, गरज पडल्यास पर्याय टँकरची पुरेशी व्यवस्था करण्याची  सूचना देखील  दिल्या आहेत.
सर्व ड्रेनेज लाईन तपासून घेऊन दिनांक ५ सप्टेंबर पूर्वीच सर्व लिकेज काढून घेण्या बाबत सूचित केले आहे.


महापालिका क्षेत्रात  रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट चालू राहतील याबाबत आवश्यक त्या  उपाययोजना करणे  तसेच विसर्जन मार्ग व विसर्जनाची ठिकाणे या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था   करण्या बाबत सूचित केले आहे.
अग्निशमन विभागा मार्फत मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा पुरेशी  सज्ज असणार आहे,
सांगली व मिरज येथे विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशा तराफा व क्रेनची व्यवस्था झाल्याची खात्री  करून  तराफ चालवणाऱ्या कुशल व्यक्तींची बैठकी घेऊन व्यवस्था  देखील घेण्यासाठी या वेळी स्पष्ठ पणे नमूद केले आहे.
मिरवणूक मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून घ्यावेत वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून कामकाज या कालावधीत करण्याचे आहे  ,अतिक्रमण विभाग यांनी दक्षता घ्यावी असे या वेळी आदेश देण्यात आले आहे. श्री गणेशोत्सव काळात पुरेशा प्रमाणा मध्ये वैद्यकीय पथके तयार  असणार आहेत,
अनधिकृत व विनापरवाना डिजिटल बोर्ड लागणार नाहीत याची दक्षता  घेण्यात येणार आहे.  डिजिटल बोर्डला परवानगी देताना त्यावरील मजकूर पोलीस विभागाकडून तपासून घेऊनच परवानगी दिली जाणार आहे,  संवेदनशील मजकूर आणि प्रसंगी पोलीस मदत घेऊन कामगिरी पूर्ण करण्यात येणार आहे,
पोलीस विभागाशी समन्वय साधून पुरेशा प्रमाणामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था  या वेळी करण्यात येणार
 आहे, कोणताही प्रसंग निर्माण झाला तरी तयारी पूर्ण असणार आहे, 

 मिरवणूक मार्गावरील  धोकादायक झाडे व फांद्या  काढून घेण्यात येत आहे , काही भागात अजून काम चालू आहे,  ते वेळेत पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत,
गणपती आगमन व विसर्जन मार्ग तसेच विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे तसेच भटक्या जनावरांना पकडणे, भटक्या कुत्र्याबाबत कार्यवाही करणे.
स्वच्छता साठी शिफ्ट अनुसार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.
महिलांसाठी स्वतंत्र मोबाईल टॉयलेटची व्यवस्था मिरवणूक मार्ग तसेच गर्दी या ठिकाणी देखील करण्यात येणार आहे.

 सदर बैठकीस  अति आयुक्त रविकांत आडसूळ ,उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त संजय ओहोळ,मुख्य लेखा परीक्षक  श्री  धनवे , सहा आयुक्त , शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सर्व खाते प्रमुख उपस्थित होते .


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.