राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश सुधाकर घारे बरसले खालापूरातील एमआयडीसी थांबवण्याचं काम कुणी केलं ? अप्रत्यक्षपणे आमदार थोरवेंवर निशाणा....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश सुधाकर घारे बरसले खालापूरातील एमआयडीसी थांबवण्याचं काम कुणी केलं ? अप्रत्यक्षपणे आमदार थोरवेंवर निशाणा....



लोकसंदेश कर्जत प्रतिनिधी: भूषण प्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच
शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश
सुधाकर घारे बरसले खालापूरातील एमआयडीसी थांबवण्याचं काम कुणी केलं ? अप्रत्यक्षपणे आमदार थोरवेंवर निशाणा.....

खालापूर तालुक्यात मोठी इंटस्ट्रीज आहे, तालुक्यात मोठी एमआयडीसी आलेली आहे, ती एमआयडीसी थांबवण्याचं काम कुणी केलयं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. असा आरोप करतानाच माझा कार्यकर्ता का दोन दोन वेळा उपोषणाला का बसला होता..?? तर शेतकऱ्याची जमीन कोणी गिळली.. हे सुद्धा आपणा सर्वांना माहिती आहे. पुढच्या काळात त्याला सुद्धा आपण वाचा फोडण्याचं काम करणार आहोत. अशा शब्दात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला. 


कर्जत येथे रविवारी (दि.४) रोजी सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अमित देशमुख  आणि आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष शिवा शिवचरण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटात)प्रवेश केला. देशमुख यांच्या समवेत नारंगी, दत्तवाडी, डोनवत, मेरकूटवाडी, तांबतीवाडी, इसांबे, ईसांबेवाडी या गावातील सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तसेच भगवान चंचे, कविता शिंगवा, गोमा निरगुडा, सुनील कांबडी, मीरा गावित या नेरळ ग्रामपंचायत मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अमित देशमुख यांना खालापूर तालुका राष्ट्रवादीचे प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली. 
यावेळी बोलताना घारे म्हणाले, या तालुक्याचा या मतदार संघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीन विकास आपल्याला करायचा आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचा विकासाठी आपल्याला येणारी विधानसभा लढवायची आहे. आपणा सर्वांचा आशीर्वाद घेऊन ही निवडणुक लढवणार आहे आणि सर्वांच्या माध्यमातून ती जिंकणार सुद्धा आहोत.
घारे म्हणाले, सुधाकर घारे कोणाचा अपमान करत नाही. सुधाकर घारेंवर आई-वडिलांनी चांगले संस्कार दिलेत. माझ्या माता भगिनींचा सन्मान कसा केला पाहिजे, माझ्या तालुक्यातील माझ्या मतदार संघातील जनतेचा सन्मान कसा केला पाहिजे. तो खरा आपल्या माध्यमातून, तालुक्यातील प्रमुखांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकवण दिलेली आहे. 
घारे यावेळी म्हणाले, आपल्या सर्वांचा मान सन्मान राखला जाईल. आपल्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम केलं जाईल. आपल्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं जाईल. आपण सर्व माझ्यावर, पक्षावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. आपल्याला सर्वांना एकत्रित होऊन हा पक्ष पुढे घेऊन जायचं आहे. 
लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितलेलं आहे, कुणी आपल्याला विट मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर आपण दगडाने देणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना संरक्षण दिलं जाईल. आपल्या सर्वांना ताकद दिली जाईल. आपण घाबरण्याची गरज नाही, असे देखील घारे यावेळी म्हणाले. 




*पगार देऊन ट्रोलींगसाठी लोक ठेवलेत !*
जे आपल्याला ट्रोलींग करत असतात ते थोड्यावेळाने आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला येथे पगार देऊन ठेवलयं. आम्हाला आमचं काम करावं लागतं. आम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते. जर आम्ही तुमच्याबाबतीत काही चुकीचं बोललो नाही तर आम्हाला वेळेवर पगार मिळणार नाही, ही पगार घेऊन काम करणारी मंडळी आहेत. या मंडळीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत, असा विश्वास यावेळी घारे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
*‘जातीपातीचं राजकारण आपण करत नाही’*
घारे यावेळी म्हणाले, या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जाळे पाहिले तर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नंबरचा पक्ष आहे. आपण कधी जातीपातीचं राजकारण करत नाही. आपण सर्व जातींना एकत्र घेऊन सोबत घेऊन काम करतोय. त्यामध्ये माझे आदीवासी बांधव असतील, इतर कोणत्याही जातीचे बांधव असतील त्यांना सर्वांना कुठल्याही प्रकारे अपमानित होणार नाही, कुठल्याही प्रकारे अपशब्द जाणार नाही, अशा पद्धतीने या पुढच्या काळात त्यांना ताकद देण्याचं काम करतोय.
*राष्ट्रवादी काँग्रेस हुकुमशाहीवर घाला घालणार !*
मी कधीच कार्यकर्त्यांना सांगणार नाही, तुम्ही याच्याशी भांडण करा. तम्ही याचे पाय तोडा, त्याचे हात तोडा, याला मारा, त्याला झोडा मी असं कधी करणार नाही. आपण विरोधी बाजूला पाहिलं असेल तर फक्त भांडणे लावण्याचं काम चालू असतं. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या जातात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्जतमधील ही हुकूमशाही संपणार आहे. या हुकुशाहीवर घाला घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे. जे आपल्या विचारांचे घटक पक्ष असतील त्या घटक पक्षांना सोबत घेऊन ही जी हुकुमशाही चालली आहे ती थांबवणार आहोत, असा इशारा घारे यांनी यावेळी दिला. 
*स्थानिकांना रोजगारासाठी काम करणार !*
या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनीधींचा ठेका आहे, स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. स्थानिकांवर अन्याय केला जातो. स्थानिक ग्रामस्थांना वारंवार उपोषण करावं लागतं. पुढच्या काळामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण काम करणार आहोत. आपण राजकारण करत असताना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर केलं पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलं पाहिजे. कोणत्या समाजावर अन्याय होणार नाही, कोणत्या गरीबावर अन्याय होणार नाही. युवकावर विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे घारे यावेळी म्हणाले. 
*“तालुक्यात शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आवश्यक”*
तालुक्यात रोजगार आणणे गरजेचं आहे, मतदार संघात शैक्षणिक सुविधा आणणं गरजेचं आहे. चागली आरोग्य व्यवस्था आणणं गरजेचं आहे. येथे सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे. पुणे-मुंबईला जोडणारा हा कर्जत खालापूर मतदारसंघ आहे. खालापूर तालुक्यात ३६१ लिस्टेड कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये आपल्या लोकांना किती रोजगार आहे ?  तिथे कोणाकोणाचे ठेके आहेत ?  असा सवाल यावेळी घारे यांनी केला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ रायगड