सांगली लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने ..
सांगली मध्ये मोटरसायकल चोरट्यास शिताफीने अटक एलसीबीची कारवाई....
आरोपीचे नावं . प्रदीप कल्लाप्पा हलिनाल्ली, ३२, रु. जैन बस्ती, शिरहट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक,
उघड गुन्हे
१. M.I.D.C. कुप्याड पोलीस स्टेशन, जी.आर. क्र. 185/2024 B.N.S. 2023 कलम 303(2)
कुडची पोलीस ठाणे, राज्य कर्नाटक, गु.र.नं. १८५/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे जप्त मुद्देमाल
१. ५०,०००/-रु. किंमतीची १ हॉण्डा कंपनीची सीबी शाईन काळया चॉकलेट रंगाची मोटार सायकल जु.वा.किं.अं. २. ४५,०००/-रु. किंमतीची १ हिरो कंपनीची एच एफ डीलक्स काळया लाल रंगाची मोटार सायकल जु.वा.कि.अं.
९५,०००/- (पंच्चान्नव हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काबुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले
होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील सपाफी / अनिल ऐनापुरे आणि पोलिस इम्रान मुल्ला यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोकल बोर्ड कॉलनी, विश्रामयाग येथे चोरीची काळया रंगाची हॉण्डा कंपनीची सी ची शाईन मोटार सायकल विक्री करण्याकरीता आला आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी, धामणी चौक परिसरात जावून निगराणी करत असताना, बातमीतील नमुद हकिकती प्रमाणे एक इसम विना नंबर प्लेटची काळया रंगाची सी. बी. शाईन मोटार सायकल घेवून रोड कडेला थांचलेला दिसला. सदर इसमाचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव व गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रदीप कल्लाप्पा हळीगंळी, वय ३२ वर्षे, रा. जैन बस्ती, शिरहट्टी, ता. अथणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्याचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, प्रदीप हळीगंळी याने सांगितले की, त्याने काही दिवसापुर्वी कुपवाड मधील हॉटेल राजमुद्रा जवळून सदरची मोटार सायकल चोरी केली असल्याची कबूली दिली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने काही दिवसापूर्वी चिंचणीच्या यात्रेतून आणखी एक हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स मोटार सायकल चोरी केली असल्याचे सांगुन ती धामणी रोडवर असले हॉलचे पाठीमागे लावली असल्याचे कबूल केले. लागलीच पंचासोचत त्याने मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता वर नमुद मोटार सायकल तेथे मिळून आली. सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीचाचत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता,
ईएम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे व कुडची पोलीस ठाणे, राज्य कर्नाटक येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटार सायकली पुढील तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष जप्त केल्या.
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन, पुढील तपास एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.
या कारवाई मध्ये अधिकारी.. आणि पोलीस कर्मचारी
सपाफी/अनिल ऐनापुरे, पोहेकॉन/इमरान मुल्ला, आमसिद्धा खोत, अमोल ऐडले, संकेत मगदूम, हणमंत लोहार, पोना/सोमनाथ गुंडे, पोशी/सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन घरटे, आदींनी भाग घेतला
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.