मज्जाच मज्जा....
सांगली जिल्ह्यामध्ये सर्व मतदार संघामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे ....
संभाव्य सर्वच इच्छुक उमेदवारानी यांनी आता "मी आमदार झाल्या सारख वाटतय!!" अशा पद्धतीने आता कामात सुरुवात केलेली आहे..
यामध्ये मात्र जनतेची लॉटरी लागून गेलेली आहे.. मज्जाच मज्जा आहे..
त्याचा अस आहे.. विद्यमान आमदार व इच्छुक आमदार यांच्यामध्ये आता जनतेसची सेवा करण्याची जणू शर्यतच लागलेली आहे....
यामुळे नागरिकांची ची मज्जाच मज्जा आहे...
यामध्ये कोणी दंडोबा यात्रेला आपल्या खर्चाने नागरिकांना घेऊन जात आहे तर ..कोणी पंढरपूरला घेऊन जात आहे.. मज्जाच मज्जा आहे ..
यामध्ये कोणी इच्छुक आमदार एका हाकेला धावून जनतेपर्यंत पोहोचत आहेत.. त्यामुळे गल्लीत छोटा मोठे कार्य असो. अथवा मयती असोत. जी मंडळी भेटत नव्हती ती आता अपसुकच उपलब्ध होत आहेत..मज्जाच मज्जा आहे
सांगली जिल्ह्यातील काही इच्छुकानी अमरनाथची यात्रा करून दिली..
तर काहीनी पंढरपूर ,दंडोबा सारख्या यात्रेला प्राधान्य दिलं.. काही दहीहंडीच्या रूपाने, तर काही सांस्कृतिक नाच गाण्याचे रूपाने, आता हे सगळं फुकटच मिळते म्हटल्यानंतर जनतेची मज्जाच मज्जा आहे ...
काही इच्छुक आमदार तर एका हाकेला धावून जात आहे..
परवा मिरजेमध्ये मेळावा घेऊन कांहीं इच्छुकांनी सर्वांना जेवणावळी दिल्याचं दिसत आहे....
"खाऊ दे गरीब" होऊ दे सावकार " या उक्ती प्रमाणे आता इच्छुक भावी आमदार पैशाच्या थैल्या रित्या करण्याच्या नादात लागलेले आहेत...
तसं पाहायला गेलं तर निवडणूक या महिन्यात दोन महिन्यात व्हायला पाहिजे होत्या...
मात्र भाजप सरकारने "लाडकी बहीण" योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवून त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणून पद्धतशीरपणे निवडणूक दोन-चार महिने परत पुढे ढकललेल्या मुळे सर्वसाधारण नागरिकांची ...मज्जाच मज्जा आहे...
तोपर्यंत नागरिकांची कोणतीही कामे आता अडवली जाणार नाहीत... अडणार नाहीत.. दिवस रात्र इच्छुक उमेदवार त्यांच्या एक हाकेला धावत जाऊन त्यांची कामे करीत आहेत..
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सांगली जिल्ह्याचा क्रमांक अशा जनसंपर्कमध्ये जास्त असल्याचे दिसून येते आहे...
सरकार दरबारी सत्ताधीशानी आपल्या आपल्या योजना मधून आपल्या सर्व मतदारांना "लाडकी बहीण" असेल "बांधकाम कामगार" किंवा एखादे महामंडळ, सर्व योजना ,बँकेचे कर्ज, वगैरे आता जोरदारपणे नागरिकांच्या कामी येत आहेत .. कोणत्याही योजने साठी नागरिक रित्या हाताने परत येत नाहीत..
विद्यमान आमदारांच्या विरोधात मिरजेसारख्या ठिकाणी त्यांच्या विरोधात चार पाच जण तरी इच्छुक आहेत....
जे एका प्रभागात सुदधा निवडून येणार नाहीत अश्या पण काही "व्यक्ती आणि वल्ली" यामध्ये सामील आहेत ...त्यांना "मी आमदार झाल्यासारखे वाटतेय"
असू द्या.. सर्वांनी स्वप्न बाळगायला काय अडचण आहे...
कधी कधी स्वप्न सुद्धा सत्यात उतरते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे.. आमदार हाफीसभाई धत्तूरे..
मिरजेमध्ये असा काहीतरी चमत्कार होतच असतो.. त्यामुळे नागरिकांची मज्जाच मज्जा आहे ..
नागरिकांनी या सर्व इच्छुक आमदारांच्या कडून उगाच आडवेढे न घेता आपला पदर घट्ट करून जास्तीत जास्त त्यांनी दिलेलं दान मग ते कोणत्याही रूपात असू दे ..आपल्या पदरात पाडून घ्यावे.. कारण मज्जाच मज्जा आहे...
उगाच कुठल्या इच्छुक आमदाराला नागरिकांनी नाराज करू नये... ते जे देत आहेत ते पैशाच्या, रूपाने साडीच्या, रूपाने देवधर्म किंवा मग वारीच्या रूपाने किंवा पर्यटनाच्या रूपाने कोणी इच्छुक आमदारांना नाराज होऊ देऊ नये ..त्यांच्याकडे मिळते तेवढे सर्व घ्याव.. शेवटी आपल्या हातात आहे आपण कोणाला मतदान करायच.. पण आज तरी ही संधी आपण सोडू नका... .
सांगली सारख्या ठिकाणी आपल्याला लाभलेली मोठीच संधीच आहे ... हे ही नसे थोडके..
त्यामुळेच आम्ही म्हणतो ..
मज्जाच मज्जा आहे.. लगे रहो मुन्नाभाई...
सलीम नदाफ : संपादक ;लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
8830247886