कर्मवीर पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न : १५% ने लाभांष देणार रावसाहेब जिनगोंडा पाटील...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मवीर पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न : १५% ने लाभांष देणार रावसाहेब जिनगोंडा पाटील...



लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी: अजय माने 

कर्मवीर पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न : १५% ने लाभांष देणार रावसाहेब जिनगोंडा पाटील...

सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली ची सन २०२३ २०२४ सालची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी सभासदांना १५% ने लाभांष देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली. या घोषणेचे सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.


सभेची सुरुवात संस्थेचे श्रध्दास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. त्यावेळी दिवंगताना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहणेत आली.


आजच्या सभेचे स्वागत, प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. आजच्या सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदविली आहे त्याचे श्रेय सभासद, संचालक, सेवक यांच्या सांधिक कार्यास दिले व सभासदांना मन्पुर्वक धन्यवाद दिले. संस्थेला सन २०२४ चा दिपस्तभ पुरस्कार मिळाल्याचे सांगताच सभासदांनी त्यांचे टाळयांनी अभिनंदन केले. संस्थेची प्रगती उल्लेखनिय असून जादा तरतुदीमुळे संस्थेच्चा ताळेबंद मजबुत झाला आहे असे त्यांनी सांपत्तिक स्थितीचे विवेचन करताना सांगितले. सभासद उन्नतीच्या योजना संस्था राबवित आहे, त्यातून त्यांची आर्थिक प्रगती होत असल्याचा आनंद त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सभासदांनी संस्थेच्या कार्यास पाठबळ देण्याचे आवाहन श्री. रावसाहेब पाटील यांनी केले. १५ टक्के लाभांपाच्या रुपाने रुपये ४ कोटी ६६ लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेव्हींग खात्यास वर्ग होवून सभा सुरु असतानाच त्याचा मेसेज सभासदांना प्राप्त झाला. त्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या सेवेचे कौतूक केले. विविध व्यक्तीकडून श्री. रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी केले. सर्व विषय सभासदांनी एक मताने मंजूर केले. त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती सविस्तर विषद केली. संस्थेच्या वाढीची आकडेवारीसह माहिती त्यांनी सभेपुढे प्रस्तुत केली. सर्वच बाबतीत संस्थेने २५ टक्केहून अधिक वाढीचा रेशो साध्य केल्याचे त्यांनी सांगितले. नविन शाखा विस्तारासह संस्थेच्या अंदाजपत्रकास सभासदांनी मंजुरी दिली.


अहवाल सालात संस्थेला १३ कोटी २५ लाखाचा निव्वळ नफा झाला असून त्याच्या विभागणीस मंजुरी दिली. मार्च अखेर संस्थेच्या ठेवी रु. १०९० कोटी ६९ लाख आहेत. कर्ज वाटप रु.८११ कोटी १३ लाख आहे. वसुल भागभांडवल रु.३४ कोटी ८५ लाख आहे. गुंतवणूक रु.३७० कोटी ७३ लाख आहे. एकूण स्वनिधी रु. १०६ कोटी २९ लाख आहे. सभासद संख्या ६३९३८ इतकी आहे. ६३ शाखातून संस्था कार्यरत आहे..


यावेळी सीए बी.डी. वांगीकर, सुदर्शन कदम, प्रकाश पाटील, सुनिल फराटे, रमेश चोपडे, विनोद पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेस व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, अॅड. एस.पी. मगदुम, डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. ओ. के. चौगुले (नाना), डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसाो थोटे. श्री. बजरंग भाऊसो माळी, श्री. आप्पासो दादू गवळी श्री. अमोल विनायक रोकडे उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले सुत्र संचलन संजय सासणे यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.