शालेय जीवनातून स्पर्धा परीक्षांची तयारी....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शालेय जीवनातून स्पर्धा परीक्षांची तयारी....


ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख 

दिनांक - 28 ऑगस्ट

 शालेय जीवनातून स्पर्धा परीक्षांची तयारी....

     'स्पर्धा परीक्षा' हा शब्द ऐकायला खूप जड वाटत असला तरी देखील त्याची सुरुवात जर शालेय जीवनापासून झाली तर तो खूप हलकाफुलका वाटत राहतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे _बिभवी   शाळा  सातारा जिल्हातील जावली तालुक्यतील निसर्ग रम्य गावातील् छोटीशी पण नावारूपाला आलेली शाळा म्हणजे माझी बिभवी शाळा_ . जावली तालुक्याने 'जावली शिष्यवृत्ती पॅटर्न' व 'क्रीडा प्रबोधिनी निवड' असे दोन दिशादर्शक उपक्रम राज्याला दिले आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय, सैनिक स्कूल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शालेय जीवनात आहेत. यासोबत शारीरिक चाचणी तयारीसाठी क्रीडा प्रबोधिनी क्रीडा ,विविध क्रीडा स्पर्धा तसेच सातारा जिल्ह्यातील अभिनव उपक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धांमधील प्रश्नमंजुषा, निबंध, हस्ताक्षर ,वक्तृत्व याही स्पर्धांचा उपयोग स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करून भावी _सुसंस्कृत_ उच्चपदस्थ अधिकारी होण्यास होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  सातारा जिल्ह्यातील जावली, माण ,फलटण, खटाव ,कराड, सातारा ,वाई,पाटण  यासारख्या अनेक तालुक्यातून  शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी प्राथमिक शाळांपासूनच उत्कृष्टरित्या केली जाते. याचाच परिपाक म्हणून सातारा जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी एमपीएससी ,यूपीएससी सारख्या स्पर्धा  परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सांगायला अभिमान वाटेल वाई तालुक्यातील भुईंज गावचे सुपुत्र स्वर्गीय  'राजेश स्वामी' हे यूपीएससीतून  आयएफएस पदी निवड होऊन  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. नुकताच यूपीएससी मधून जावली तालुक्यातील पहिला आयएएस पदावर निवड झालेला 'ओंकार पवार '  जावळीचे भूषण आहे. क्रीडा प्रबोधनी अंतर्गत निवड झालेला प्रवीण जाधव याने सलग दोन ऑलम्पिक स्पर्धा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. जावलीचा रायझिंग स्टार मयूर पवार हा देखील सायकलिंग मध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळून  रेल्वे मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. पोलीस उपनिरिक्षक म्हणून देशसेवा  करत असताना शहीद झालेला शशिकांत मोरे हा देखील जावलीचे रत्न आहे. सातारा जिल्ह्यात  वित्त व लेखाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करत असणारे मा. *योगेश करंजेकर व सितल करंजेकर* हे देखील  जावलीचे भूषण आहेत. असे जिल्ह्यातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी घडण्या पाठीमागे त्यांच्या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा व क्रीडा क्षेत्राचा खूप मोलाचा वाटा आहे.मलाही सांगायला अभिमान वाटेल मी सुद्धा शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची आवड असणारी , खो-खो- कबड्डी खेळाची उत्कृष्ट खेळाडू असल्याने शिक्षिका तर झालेच पण ज्ञानदानाचे कार्य करत सन 2008 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवडले गेले. शालेय जीवनात सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा व क्रीडा यांचा उत्तम समन्वय साधून यशप्राप्ती करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी.स्वतःमधील क्रीडा कौशल्य व ज्ञान अमृत माझ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत उतरवण्यासाठी मी ज्ञानदानाचे कार्य करत आहे. जावली शिष्यवृत्ती पॅटर्नचा  मी सुद्धा एक घटक बनून माझ्या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय जीवनातून घट्ट करत आहे. त्याला उत्तम साथ लाभते तीम्हणजे  मी सुरु केलेल्या  क्रीडा प्रबोधनी उपक्रमाची. प्रश्नमंजुषा निबंध हस्ताक्षर वक्तृत्व या सहशालेय उपक्रमांतून  विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती जोपासली जाते. याचा खूप मोठा फायदा स्पर्धा परीक्षांसाठी होत आहे. माझ्यासाठी, माझ्या तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे माझे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून निवडले गेले आहेत. यामध्ये सौरभ मर्ढेकर हवामान व कर खात्यातील एमपीएससी परीक्षेच्या एकाच वेळी दोन पोस्ट मिळवून यूपीएससीची तयारी करत आहे.वैभव जाधव वर्ग एक पदी निवड झाली आहे. हर्षाली पवार सेंट्रल बँकेमध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून निवड प्रसाद पवार भारतीय डाक विभागात निवड प्रतीक जाधव, ऋतुजा मर्ढेकर  यांची पोलीस खात्यात निवड , भारतीय सैन्य दलात अभिमानास्पद कामगिरी बजावत असणारी कु. अंकिता देशमुख ,रोहित साळुंखे , दर्शन जाधव , समीर परिहार हे विद्यार्थी माझ्या बिभवी चेच माझे विद्यार्थी आहेत. आजही अनेक शिष्यवृत्तीधारक, क्रीडा क्षेत्रात चमकलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे ते केवळ आणि केवळ त्यांचा शालेय जीवनात स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम झाला आहे म्हणूनच. भविष्यात जावली आणि सातारा जिल्ह्यातून अनेक भावी उच्च पदस्थ अधिकारी आपणास पाहावयास मिळतील याचे सर्वश्रेय शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांना जाते. म्हणून मला आज  माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी आवर्जून सांगावेसे वाटते की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ,क्रीडा क्षेत्रात संधी देऊन त्यांना उत्तम मार्गदर्शन करून सुसंस्कृत उच्चपदस्थ अधिकारी घडवण्यास हातभार लावून आपला  भारत देश महासत्ता बनवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलून  महान राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा.मला सुद्धा मी सुरू केलेले ज्ञानदानाचे, क्रीडा क्षेत्राचे  कार्य अखंड यशस्वी  चालू राहण्यासाठी ईश्वर बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ....!


                       शब्दांकन 

             सौ सुनीता प्रताप कामटे

          जि प प्राथमीक शाळा डेरेवाडी 

          तालुका जावली जिल्हा सातारा