प्रशासकीय सभा आज डॉ वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रशासकीय सभा आज डॉ वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न..



सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासकीय सभा आज डॉ वसंतदादा पाटील सभागृहात मा . शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत संपन्न

1 ते 5 हे विविध नामकरण बाबत विषय पूर्वी मान्यता देण्यात आलेले होते त्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे

विषय क्र६. सन २०२४-२५, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकासासाठी विशेष तरतुद या योजनेंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर विषयपत्रातील नमुद एकूण ०३ कामांचा र.रु. ५ कोटी मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता साठी देण्यात आला आहे

विषय क्र७. सांगली स.नं.२२९/१/१ (नवा १६१/१/१) या मिळकतीमधून जाणाऱ्या २४.४० मी.डी.पी.रस्त्याचे भूसंपादनाबाबत धोरणात्मक निर्णय घेणेकामी सादर करण्यात आला आहे, त्यास मान्यता देण्यात आली आहे.

विषय क्र ८. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) बळकटीकरण योजनेंतर्गत अग्निशमन विभागाकरीता विविध साहित्य खरेदी करणे अंदाजपत्रकीय र.रु.७३,३३,०००/- मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजूरीस्तव पाठविणेस मान्यता देण्यात आली आहे

विषय क्र९. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कामे निश्चित करुन, सदर कामांचा र.रु.१७,५४,६७,०८९/- मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणेत आली आहे

विषय क्र१०. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजना सन २०२४-२५ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कामे निश्चित करुन, सदर कामांचा र.रु.१३,३०,४८,०१२/- मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणेकामी अतिरिक्त आयुक्त (बांधकाम विभाग) यांचेसांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर एकूण ०३ कार्माचा र.रु.५ कोटी मात्रच्या प्रस्तावातील कामे बदलून विषयपत्रातील नमूद ०५ कामांचा र.रु.१.५० कोटी मात्रचा प्रस्ताव सहाय्यक अभियंता श्रेणी -१, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मिरज यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणेत आली आहे.

विषय क्र१४. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकासासाठी विशेष तरतुद योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याकरीता अत्यावश्यक कामे अंतर्गत नळ कनेक्शन करीता पाणी मिटर पुरविणेकामी प्राप्त शासन मान्यतेच्या अनुषंगाने परिपूर्ण र.रु.१२ कोटी मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणेत येत आहे.

विषय क्र१५. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कृष्णाघाट जॅकवेल येथे नविन २५० एच.पी.क्षमतेचे व्ही.टी.पंप खरेदी साठी अंदाजपत्रकीय र.रु.१,८९,३२,३००/- मात्रचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविस मान्यता दिली आहे



विषय क्र१६. मिरज येथील कमानवेस भागातील चक्कर सडक या ५० फुट रुंदीच्या डी.पी. रस्त्यावर असलेले सार्वजनिक शौचालय पाडणेस धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे.

विषय क्र१७. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शासन अनुदाने व मनपा निधी गुंतवणूकीचे अधिकार मा. उपायुक्त, मुख्यालय यांना प्रदान करणेस मान्यता देणेत येत आहे.

विषय क्र१८. शासना कडून प्राप्त झालेल्या रस्ता अनुदान या निधीतून सांगली एस टी स्टॅन्ड ते आझाद चौक या रस्त्याचे दुरुस्तीकामी र.रु.१.५० कोटी मात्रचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणे आली आहे.

विषय क्र१९. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नं.०७, सांगली करीता विद्यार्थी वाहतुकीसाठी दोन नग स्कूल बस वाहने खरेदी करणे र.रु.४६ लाख मात्रचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती यांचेकडे प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीस्तव पाठविणेस मान्यता देणेत आली आहे.
वरील प्रमाणे विषयास मान्यता झाली आहे, नगरसचिव यांनी अशी माहिती दिली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.