महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिअल अँड अग्रिकल्चर च्या कौशल्य विकास व शिक्षण समितीच्या चेयरमैन पदी संदीप भंडारी यांची निवड..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिअल अँड अग्रिकल्चर च्या कौशल्य विकास व शिक्षण समितीच्या चेयरमैन पदी संदीप भंडारी यांची निवड..



पुणे प्रतिनिधी पारस मुथा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिअल अँड अग्रिकल्चर च्या कौशल्य विकास व शिक्षण समितीच्या चेयरमैन पदी संदीप भंडारी यांची निवड..

98 वर्षाची परंपरा असलेल्या व शतकपूर्ती कडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील शिखर संस्था, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या "कौशल्य विकास व शिक्षण समिती" च्या चेयरमैन पदी संदीप भंडारी यांची तर को- चैरमन पदी प्रा. मनोज चव्हाण व व्ही.नामदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नियुक्ती चे पत्र नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले.

भाजपा जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष असलेले संदीप भंडारी हे महाराष्ट्राचे चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सक्रिय आहे व यापूर्वी त्यांनी रियल स्टेट कमिटी को - चैरमान, युथ विंग कमिटी चेअरमन, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर अशी विविध पदे उपभोगली आहे.

ललित गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये इंडस्ट्रियल मीट व रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे संदीप भंडारी यांनी घोषित केले व त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये लातूर अकोला पुणे नाशिक व ठाणे येथे रोजगार व व्यापार उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही संदीप भंडारी यांनी दिली.

या कार्यक्रमांतर्गत इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आणि बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशन अशा विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील. अशिक्षित, अर्ध-शिक्षित आणि कौशल्य प्राप्त कर्मचाऱ्यांना या संधींमुळे उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतील. इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपद्वारे व्यावहारिक अनुभव आणि तांत्रिक ज्ञान मिळवता येईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यांचा विकास करता येईल, जेनेकरू त्यांना उद्योगांच्या गरजेनुसार त्वरित रोजगार मिळवून देईल.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संदीप भंडारी यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व विश्वास व्यक्त केला की यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील कौशल्य विकास क्षेत्रात भरीव कामगिरी होईल आणि उच्च शिक्षणाच्या संधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे राज्यातील युवकांना आपल्या कौशल्यांचा विकास करून रोजगार मिळविण्यात मदत होईल, असेही त्यांनी नमुद केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /पुणे.