लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा
कोलवडी येथे घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा, युनिट ६ ने केले एकूण ०२ गुन्हे उघड...
दिनांक १०/०८/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट ६ च्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे महेश चव्हाण हा आव्हाळवाडी गावचे हददीत निळकंठेश्वर मंदिराजवळ, मोकळ्या मैदानात, आव्हाळवाडी येथे थांबलेला आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमी मा. वरीष्ठांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे जावून खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीप्रमाणे जावून खात्री केली असता सदर विकाणी महेश चव्हाण हा संशयीतरीत्या थांबलेला दिसला, आम्हाला पाहून तो पळून जावु लागल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण वय १९ वर्षे रा. कॅनॉलजवळ, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडती दरम्यान तो त्याचे खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथिदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी चोरी केल्याचे सांगून सदरचे सोन्याचे दागिने हे त्यातीलच असल्याचे कबूल केले आहे. सदरबाबत अभिलेख तपासले असता वर नमूद आरोपीकडून गुन्हे उघडकीस आलेले आहेत
आरोपीकडून दोन्ही गुन्हयातील ३४.५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २,४५,०००/- रु किं चा मुददेमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. आरोपी महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी वानवडी, चंदननगर, हडपसर, भारती विदयापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे अगोल झेंडे, गा. सहा, पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने यांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे