शरदचंद्र पवार नावाच्या जातीयवादी अजगराच्या विळख्यातून महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सांगलीतील तरूण भारत स्टेडियमवरील ओबीसींच्या मोर्चात सहभागी व्हा अन्यथा होणारे परिणाम भोगा....
: भाई शिवराम मासाळ
------------------------
आज दि.११रोजी होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा सांगलीतील तरूण भारत स्टेडियमवर दुपारी २वाजता आयोजीत केलेला हा भव्य मेळावा म्हणजे महाराष्ट्रातील ३४६जातींच्या आरक्षण संरक्षणाचा मेळावा आहे, त्यासाठीं आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे म्हणून उपस्थिती गरजेची आहे,ह्याला कोणी आम्हांला सांगितले/निमंत्रण नाही,अशी थोतांड कारणे देऊ नयेत, प्रत्येकांनी आपली राजकीय कपडे,पायताने (जोडे) बाजूला ठेवून उपस्थित राहावे ,कोणाची तरी गुलामी करण्यापेक्षा आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरा, कायदेशीर लढाईंत सहभागी व्हा, अन्यथा तुमचं आरक्षण संपले म्हणून समजा सध्याचे सरकार हे डरपोक आणी बुद्धीहीन सरकार आहे, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा जपन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपशेल अपयशी ठरले आहेत. आणी विरोधकांचा देखील दुसर्याच्या काठीने साप 🐍 मारायचा डाव आहे, महाराष्ट्रात शरदचंद्र पवार यांच्या विरोधात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर जातीयदंगली, सामाजिक द्वेष निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही,सध्या महाराष्ट्रात ओबीसी विरूद्ध मराठा आरक्षणाचा कुटील डाव सत्ताधारी व विरोधक मिळून खेळताना दिसत आहेत, राष्ट्रवादी व शिवसेना फूटीने आपआपल्या मतांचे गठ्ठे शाबूत ठेवण्यासाठी दोघेही जण अळीमिळी गुप्प चिळी पद्धतीने वाट बघत बसलेत .
सरकार आणी विरोधक दोघेही कायद्याला फाट्यावर मारून सत्ताउपभोगत आहेत,
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाची भुमिका मांडताना तासातासाला बदलताना दिसत आहेत त्यावर मतांच्या लाचारीपोटी सत्ताधारी व विरोधक त्यांना उत्तर देत नाही, मराठा समाजाला खोटी आश्वासने देऊन झूलवत ठेवायचे काम सुरू असताना, ओबीसींना देखील सरकार सांगत आहे, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी थोतांड उत्तरे देऊन,एका बाजूने घटनाबाह्य कुणबी करणाचा डाव घातला आहे, जो खरचं कुणबी आहे,त्याला कोणाचाही विरोध नव्हता आणि नाही मगं ही झुंडशाही कोणाविरोधात आहे, गावागावात,तालूक्यात, जिल्ह्यात मोर्चे कशासाठी?
मराठा समाजातील आंदोलकांनी एकदा स्पष्ट सांगावे आम्ही मागासवर्गीय आहोत आणी मागासवर्गाच्या आम्ही अटी शर्ती पुर्ण करू शकतो आणी आम्हांला शिक्षणासाठी व नोकरी साठी आरक्षण हवे आहे जर हे सत्य असेल तर ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवे आहे. ,अरे आपण नक्की आरक्षण कोण्याच्या हिश्याचे मागतोय नंदीबैलवाला,कैकाडी ,दरवेशी, लोहार,सुतार,मुलाणी, तांबोळी,लमाण,पोपटवाला,डोंबारी, मसणजोगी,भामटा व अशा ३४६ तत्सम जातींचे? हे योग्य आहे का?
मराठा आंदोलक हे मराठा समाजातील गरीब तरूणांना त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तरूणांची माथी भडकवताना समोर येत आहे,गावगाड्यातील ओबीसी आणी मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करताना दिसतायत आणी उलटपक्षी ओबीसी नेते मंत्रीमहोदय छगन भुजबळ,प्रा.लक्ष्मण हाके, आमदार गोपीचंद पडळकर ,शब्बीर आन्सारी यांनी ओबीसींची भूमिका मांडताना शिव,फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील वारसा जपत कुठेही मराठा आंदोलकांचा व मराठा समाजाचाआवमान होईल असे वक्तव्य करताना दिसले नाहीत,
प्रा.लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असताना त्यांच्या लक्षात आले इथे सरकारच्या तालावर नाचून असंविधानिक काम करावे लागत आहे हे लक्षात आल्यावर प्रा. हाके यांना राज्य मागासवर्ग आयोगाच्या पदाचा राजीनामा (अक्षरशः लाथ मारून)देऊन महाराष्ट्रात ओबीसी जागृती मोहीम आखली . आज हाकेंच्या बरोबर चर्चेसाठी संविधानिक मुद्यांवर कोणीही चर्चेसाठी तयार का होत नाहीत जरा विचार करा?
प्रा.लक्ष्मण हाके सर यांची पार्श्वभूमी..
प्रा.लक्ष्मण हाके सर हे बहूजन चळवळीतील लखलखता तारा 🔯 आहे कधी काळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली होती तद्नंतर पक्षात काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्षापासून फारकत घेतली परंतू शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत तयार झाल्यामुळे त्यांचे रक्त शांत राहत नव्हते त्यांनी अन्याया विरोधात काम करणे थांबवले नाही, त्यांनी सांगोला विधानसभा निवडणूक देखील लढवली,धनगर आरक्षण चळवळीतील रणझुंजार कार्यकर्ता म्हणून पंढरपूर ते बारामती आंदोलनात सक्रिय भाग घेऊन ते बारामतीतील धनगर आरक्षण चळवळीतील उपोषणकर्ते म्हणून नावारूपाला आले, पुढे ते शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करू लागले त्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क आल्यावर त्यांची निवड आपल्या बुद्धीकौशल्याच्या बळावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली त्यावेळी त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली परंतू महाराष्ट्रांतील मागासवर्गीय आयोग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताटाखालचे मांजर 🐈 आसल्याचे लक्षात आल्यावर आपले विचार परखड मांडण्यास सुरूवात केली, तेंव्हा त्यांची तिथे ससेहोलपट होत आहे हे लक्षात आले,आणी मागासवर्गीय आयोग हा मराठा आयोग आहे ,असे त्यांनी छाती ठोकपणे सांगितले आणी राजीनामा देऊन बाहेर पडले आणी पायात भिंगरी बांधून आवघा महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी महाराष्ट्रातील तमाम वंचित मागासवर्गीय जागा करण्याचे काम केले ,प्रा. हाके यांचा युक्तीवाद इतका जोरदार होता की त्यांचे मुद्दे खोडणे भल्याभल्यांना शक्य नव्हते तेव्हा सोशल मिडियातून त्यांचेवर टिका करणे सूरू झाले,टिकेला घाबरून पळ काढून जाणारा हा पट्ट्या नाही हे लक्ष्यात आल्यावर हाकेंच्याकडे दूर्लक्ष करूंन ओबीसी नेत्यांना टार्गेट करून सुपारी बहाद्दर आंदोलनकर्त्यांचा डाव लोकसभेत महायूतीतून निवडणूक लढवणारे नेते पराभूत करणे हेच उद्दिष्ट होते हे दिसून आंधळे आसण्याचे काम महाविकास आघाडीतील ओबीसी मतदार व कार्यकर्ते करत होते,त्यांना माझा प्रश्न आहे आणखी किती दिवस असेच बुद्धीहिन वागणार आहात?
ओबीसींचे राष्ट्यीय नेतृत्व छगन भुजबळ यांची थोडक्यात पार्श्वभूमी....
मंत्रीमहोदय छगन भुजबळ हे मंडल आयोगाच्या मुद्द्यांवरून शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कपटी शरदचंद्र पवार यांच्या भुलथापांना बळी पडून राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले ,मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हां मंडल आयोगाच्या बरोबरचं तत्कालीन प्रधानमंत्री मा .विश्वनाथ प्रताप सिंह यांनी अॅट्रोसिटी अॅक्ट देखील मजबूत केला होता,ह्या दोन्ही कायद्याने महाराष्ट्रात मराठा समाजाचे कंबरडे मोडल्याने लक्षात उशीरा आले होते, अनुसुचित जाती कायद्यामुळे प्रस्थापित मराठा समाजाला हवे दलीतांना वागवता येत नव्हते त्यांची पिढ्यानपिढ्यांची पिळवणूक कमी झाली होती त्यामुळे गावातील पाटील ,जाहगीरदार यांच्यावर वचक बसली आहे.आणी मंडल आयोगामुळे १९९१ नंतर गावगाड्यातील न्हावी,सुतार,कुंभार हे पंचायतीत जाऊन पंचायत करू लागले,कोणी सरपंच झाला,कोणी सभापती झाला सुरूवातीच्या काळात ही मंडळी गावगाड्यातील मराठा समाजाच्या ताटाखालील 🐈मांजर होती, कालांतराने ही मंडळी स्वाभिमानाची भाषा बोलू लागली तिथेच माशी शिंकली,आज हे मराठा आंदोलन त्यातूनचं उभे राहिलेले असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
ही नकळत शरदचंद्र पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुरोगामी चळवळीतील भाडखांऊची टोळी सांभाळली महाराष्ट्रात ब्राम्हण द्वेष पसरविण्याचे काम सूरू केले मागील सात ते आठ वर्षांपासून हे भाडखाऊ पुरोगामी शरद पवार व उद्धव ठाकरेंच्या पक्षात दिसतात एखादा तर जातीयवादी शरदचंद्र पवार ह्यांच्या पोटातील ओठावर आले तेंव्हा ते पुर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे (देवेंद्र )छत्रपतींना नेमतात,राजू शेट्टी ह्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला होता. तेव्हा पत्रकार मूग गिळून बसले होते.ही खंत पवारांना होती ही गोष्ट भुजबळांच्या सारख्या नेत्यांच्या लक्षात यायची राहील का?पवारांच्या दुटप्पी वागण्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांची तिथे घुसमट होत होती! तेंव्हा त्यांनी समता परीषद स्थापन केली.
समता परीषेदेच्या मध्यभागातून महाराष्ट्रातील माळी समाज सह बिहार मधील सैनी समाजाचा ५लाख लोकांचा मेळावा घेतला आणी तिथेच कपटी शरदचंद्र पवारांच्या डोक्यात भुजबळ गेले आणी षडयंत्र करून तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात आडकवले *(तेलगीने ह्या प्रकरणात शरद पवार यांचे देखील नाव घेतले होते)* परंतू चाणाक्ष भुजबळांनी शांतपणे हेही दिवस जातील असे समजून दिवस काढले, भुजबळ कारागृहातून बाहेर आल्यावर भुजबळांना वगळले तर राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान होईल म्हणून उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात स्थान दिले तो पर्यंत भुजबळांनी अनेक पदे भुषवली होती मुंबईचे महापौर ते राज्याचे गृहमंत्री व दोनवेळा उपमुख्यमंत्री पदे भोगली होती, त्यांनंतर जेंव्हा ओबीसी आरक्षण धोक्यात येत आहे लक्षात आल्यावर मंत्रीपदाची तमा न बाळगता छगन भुजबळ नावाच्या पैलवानाने वयाच्या ७५व्या वर्षी शड्डू टोकून स्वजातीपेक्षा भटक्या समूहासह वंचीत ३४६ ओबीसींच्या जातींसाठी मैदानात उतरला असे उदाहरण भारताच्या इतिहासातील पहिलेच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ,ह्याच कारणामुळे भुजबळ हे सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत.
वंचितांच्या प्रश्नांचा आवाज आसणारे नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर...
वंचितांच्या प्रश्नांचा आवाज असणारे दुष्काळाला लाथ मारून पाणी काढणारे नेतृत्व म्हणून नावारूपाला आलेल्या नवयुवकांचे आशास्थान व श्रद्धास्थान गोपीचंद पडळकर वेगवेगळ्या आंदोलनाचा चेहरा महाराष्ट्राला परिचित झाला आहे,आज मी सोशल मिडीयावर बघतो विचारशून्य मराठा आंदोलक चुकीच्या बातम्या पसरवतात गोपीचंद पडळकर हा जातीयवादी आहे परंतू ,मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीचे आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातून सर्वप्रथम आवाज उडवणारे माथाडी नेते स्व.आण्णासाहेब पाटील नंतर लोकनेते महादेवराव जानकर यांनी आवाज उठवला त्यानंतर स्व.विनायकराव मेटे यांनी अनेक आंदोलने केली त्यानंतर सांगलीचा बहाद्दर पठ्ठ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या सोबत कवठेमहांकाळ येथे धनगर व मराठा आरक्षणावर मोर्चा काढून आम्हीं शरदचंद्र पवार सारखें जातीयवादी नसून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे पुजक आहोंत हे दाखवून दिलें,२०१४साली सांगलीतील लोकसभेच्या प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर मराठा, रामोशी, धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडणारा हा एकमेव रांगडा माणदेशी वाघ 🐅 गोपीचंद पडळकर होता, तेंव्हा कुठे स्वतः ला मराठा समजणारे झोपले होते का?
*जिथे प्रश्न तिथे उत्तर म्हणजेच पडळकर*
प्रश्न कोणताही असो तिथे आमदार गोपीचंद पडळकर हे दत्त म्हणून उभे ठाकलेले असतात ह्याचा परिचय महाराष्ट्राने पाहिले आहे सांगली जिल्हा म्हणजे पुढार्यांची खाण म्हणून परिचित आहे.त्यातील आटपाडी तालूका म्हणजे विविधतेचे नटलेला साहित्याची खाण असलेला तालूका, डोंगराची रांग असलेला तालूका त्याची प्रचिती आमच्या दिवंगत नेत्यांना नव्हती का? स्व. वसंतदादा पाटील पासून सुरू होणारी मंत्र्यांची मांदियाळी अगदी स्व.राजारामबापू पाटील,स्व. पतंगराव कदम,स्व. मदन पाटील,स्व.आर.आर. पाटील, अजितराव घोरपडे, जयंतराव पाटील,चार वेळा आमदारकीची लुसलुशीत खुर्ची भोगणारे स्व.अनिल बाबर यांनी नेतृत्व करून देखील आटपाडी तालुक्यात डोंगर आहेत माहित नव्हते का? मगं डोंगर विकास कार्यक्रम अंतर्गत ह्या तालुक्यातील अनेक गावांचा समावेश का केला नाही? हे गोपीचंद पडळकर यांना करावे लागले प्रश्न कोण विचारणार? आहे का धाडस मराठा तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्या नेतृत्वात?
रामोशी समाजाचे महामंडळ असो किंवा लिंगायत,गुरव समाजाचे महामंडळ असो ह्यासाठी पडळकरचं का? तुम्ही कुठे शेंगा चाळायला जाता का? एस.टी. महामंडळाचे बळकटीकरण असो किंवा धनगरांचे आंदोलन किंवा अनेक आंदोलने ही पडळकरचं का करतात ही सर्व आंदोलने शंभर टक्के यशस्वी झाली नसतील ,मात्र त्यां प्रत्येक आंदोलनात यश मात्र मिळवले हे शेंबडं पोरगं देखील सांगेल.
मित्रांनो जातीयवादाच्या व धर्म वादाच्या वेडापायी अशी नेतृत्व संपवू नका. अन्यथा आज सुपारी घेऊन होत असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे कधीही भरून निघणार नाही असे सामाजिक नुकसान होत आहे.
#
🖊️ भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष बळीराजा फौंडेशन
जांभुळणी ता.आटपाडी जि.सांगली
९९२२१७३२८४
--------------------------------------------------
टिप. मराठा आणी ओबीसी बांधवांनी गावोगावी चर्चासत्रे आयोजीत करावीत अन्यथा भविष्यात तुमच्या टोळ्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.