लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी: मयुरी नाईक
सेवाभावी संस्थातर्फे सांगलीत
कष्टकरी महिलांना साडी वाटप
सांगली: ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशन, सेवा फाऊंडेशन व लाडकी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग नऊमधील गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले. गुलाबराव पाटील मेमोरियल फौंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. विजया पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.
प्रा. विजया पाटील म्हणाल्या, ‘‘आज भावाच्या उपवासाचा दिवस. पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवी संस्थांनी कष्टकरी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. हा आनंद वेगळा आहे. गोरगरीब महिलांना मदत करणे, त्यांच्या कष्टाचा आदर करणे हे महत्वाचे आहे. कष्ट करून घर चालवणाऱ्या महिलांचा सन्मान व्हायला हवा. त्यांच्या कष्टाला आधार मिळायला हवा. तीच आपली खरी संस्कृती आहे. महापूर व कोरोना काळात पृथ्वीराज पाटील फौंडेशनने केलेले काम लक्षवेधी आहे. आज एक हजार महिलांना साड्या देऊन ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशन, सेवा फाऊंडेशन व लाडकी सेवाभावी संस्था महिला सन्मानाचे काम करत आहेत.’’
यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी मार्गदर्शन केले. अल्ताफ पेंढारी, प्रशांत माने व इरफान केडीया यांच्या कामाचे कौतुक केले. सुहास वांजूळे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले. अल्ताफ पेंढारी यांनी आभार मानले. ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशनचे प्रशांत माने, सेवा फाऊंडेशनचे इरफान केडिया आणि लाडकी सेवाभावी संस्थेचे अल्ताफ पेंढारी यांनी संयोजन केले. सुभद्रा गोरे, भारत दुधाळ, प्रा. गावडे, स्नेहल गौंडाजे, बिलकीस केडिया, सुहास वांजूळे उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.