अटल सेतू नंतर आता कोकणच्या विकासासाठी महाराष्ट्राला मिळणार 376 किलोमीटर लांबीच्या नवीन महामार्गाची भेट..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अटल सेतू नंतर आता कोकणच्या विकासासाठी महाराष्ट्राला मिळणार 376 किलोमीटर लांबीच्या नवीन महामार्गाची भेट..


लोकसंदेश न्यूज मुंबई 

अटल सेतू नंतर आता कोकणच्या विकासासाठी
महाराष्ट्राला मिळणार 376 किलोमीटर लांबीच्या नवीन महामार्गाची भेट ! 12 तासाचा प्रवास फक्त 6 तासात, 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित ..

मुंबई ते गोवा दरम्यान एक नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जाणार असून याला आता "कोकण एक्सप्रेस वे" या नावाने ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे मुंबईपासून कोकण व गोवा हा मार्ग सुलभ आणि जवळचा होणार आहे



सरकारने रस्त्यामुळे प्रगती होते या उक्तीप्रमाणे नवनवीन रस्ते बांधणीसाठीमहाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून विशेष प्रयत्न केले गेले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत नक्कीच मजबूत झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतं आहे.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे कोकणातील नागरिकांच्या माध्यमातून यावरून सरकारला घेरले जात होते कोकणातील नागरिक मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे नाराज आहेत. मात्र भविष्यात मुंबई ते कोकण हा प्रवास जलद होणार आहे.


मुंबई ते गोवा दरम्यान एक नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जाणार असून याला कोकण एक्सप्रेस वे या नावाने ओळखले जात आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महामार्ग प्रकल्पासाठी पर्यावरणाची मंजुरी आवश्यक असून यासाठी या महामार्गाचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. म्हणजेच महामार्गासाठी आवश्यक असणारी पर्यावरणाची मंजुरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

आता या महामार्गासाठी पर्यावरण विभागाच्या सूचनांनुसार संरेखनात बदल करून प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा राहणार, यामुळे कोकणातील नागरिकांना कसा फायदा मिळणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.


कसा राहणार कोकण एक्सप्रेस वे प्रगतीचा मार्ग...

कोकण एक्सप्रेस वे सहा पदरी महामार्ग राहणार याची रुंदी 100 मीटर एवढी असेल. याची लांबी ही जवळपास 376 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे.


या महामार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी जिथे हा मार्ग जोडला जाईल  तेथूनच या महामार्गावर जाता येणार आहे आणि तेथूनचं या महामार्गावरून बाहेर पडता येणार आहे. हा मार्ग अलिबागमधील शहाबाज गावातून येथून सुरू होईल अन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे संपणार आहे.

या प्रकल्पासाठी जवळपास 68,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग कोकणातील 17 तालुक्यांमधून प्रस्तावित असून या महामार्गावर 14 इंटरचेंज राहणार आहेत. यामुळे कोकणातील नागरिकांना या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

सध्या मुंबई ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा कालावधी अवघ्या सहा तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवासादरम्यान इंधनाची बचत होणार आहे आणि वेळेमध्ये सुद्धा मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत ४१ बोगदे, २१ मोठे पूल आणि ४९ छोटे पूल तयार केले जाणार आहेत.

महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करणे  शासनासाठी आव्हानात्मक ठरणार ...

या महामार्गासाठी ३७९२ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापैकी बहुतांशी जमीन ही खाजगी मालकांची आहे. यामुळे या महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करणे हे देखील शासनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /रायगड.
---------------------------------------------------------------------------------

या बातमीचे प्रायोजक आहेत... निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा . ली.आणि ईस्टेट 99 इंडिया.... मुंबई / सांगली..


        त्वरा करा... त्वरा करा.. त्वरा करा...

मुंबई व्ही टी पासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर प्लॉटस उपलब्ध... चार लाख, पाच लाख, सहा लाख, पर्यंत एक गुंठा.. एक गुंठा जरी प्लॉट खरेदी केला तरी सातबारा पत्रकी नोंदणी आनी ताबा...आजच आपला प्लॉट तातडीने विकसित होणाऱ्या "तिसऱ्या मुंबई"मध्ये खरेदी करा व मुंबईत राहण्याचा आनंद मिळवा... विकसित कोकणामध्ये आपला सहभाग घ्या  .. अशी संधी पुन्हा नाही...


अधिक माहितीसाठी संपर्क..

8830247886

9011981511