पवित्र हज यात्रा 2025
कैद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय भारत सरकार दिल्ली व हज कमिटी ऑफ इंडिया, च्या वतीने पवित्र हज यात्रा 2025 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया तारीख 14-08-2024 ते 09-09-2024 पर्यंत सुरू राहील असे जाहीर करण्यात आले आहे. तरी हज 2025 साठी इच्छुक असणाऱ्या सर्व यात्रेकरूंना तारीख 09-09-2024 पूर्वी आपले ऑनलाइन अर्ज भरण्याचे आहेत.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
1) मशीन रिडेबल इंटरनॅशनल भारतीय पासपोर्ट याची मुदत तारीख 15-01- 2026 पर्यंत आवश्यक (पासपोर्ट व झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड)
२) आधार कार्ड
3) पॅन कार्ड
4) व्हाईट बॅकग्राऊंड कलर फोटो (फ्रंट पोज आवश्यक, दोन्ही कान दिसणे आवश्यक)
5) आपला रक्तगट माहीत असणे आवश्यक (फॉर्मवर नोंदीसाठी)
6) आपल्या बँक खात्याचा कोरा रद्द केलेला चेक अथवा पासबुक
वरील प्रमाणे कागदपत्रे तयार करून ऑनलाइन फॉर्म भरण्याचे आहेत. चालू वर्षी
हज पॉलिसीमध्ये बदल केला असून सर्व माहिती घेऊन फॉर्म भरावेत.
पवित्र हज यात्रा 2025 साठी महत्वाचा बदल, ज्यांचे वय 65 वर्षे (हज कमिटीने दिलेल्या तारखेला) हुन अधिक आहे, त्यांना रिझर्व कॅटेगरी दिली आहे, परंतु त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षापर्यंतच आवश्यक आहे. एका वरिष्ठ वयाच्या हज यात्री करू सोबत एकच व्यक्ती त्यांचा सहाय्यक म्हणून जाऊ शकतो.
दरवर्षीप्रमाणे, "खिदमत हुज्जाज कमिटी , जिल्हा सांगली, यांच्या वतीने, एसटी स्टँड च्या मागे, शंभर फुटी रोडवर 'महावीर इंजिनिअरिंग वर्क्स व अमन इंजिनिअरिंग वर्क्स' च्या पहिल्या मजल्यावर मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून, या संधीचा फायदा घ्यावा व आम्हास आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन, हाजी मुनीर आत्तार, अध्यक्ष 'खिदमत हुज्जाज कमिटी', जिल्हा सांगली, यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क....
हा. मुनीर आत्तार, अध्यक्ष "खिदमत हुज्जाज कमिटी, जि. सांगली. 9225813364, // 9657863365
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.