सांगली आणि विधानसभा.. : सांगलीमध्ये गेली 15 वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातून गेलेली सत्ता अपक्ष म्हणून का होईना आपल्या हातात आणण्यात काँग्रेसला यश आले...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली आणि विधानसभा.. : सांगलीमध्ये गेली 15 वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातून गेलेली सत्ता अपक्ष म्हणून का होईना आपल्या हातात आणण्यात काँग्रेसला यश आले...


.                      संपादकीय...  


               सांगली आणि विधानसभा..

सांगलीमध्ये गेली 15 वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातून गेलेली सत्ता अपक्ष म्हणून का होईना आपल्या हातात आणण्यात काँग्रेसला यश आले... या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु व या यशाचे भागीदार फक्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते नाहीत .. तर आजूबाजूचे नाराज गट पण आहेत... त्यामुळे परवा खासदार विशाल पाटलांनी सुहास बाबर यांना आपल्या पक्षांमध्ये येण्याचे आणि संपूर्ण पाठिंबा देण्याचे जे वाचन दिले ते योग्यच होते...

सांगली विधानसभेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे...

खरं पाहायला गेलं तर या आठ दहा वर्षात कोणत्या काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेससाठी म्हणून सहभाग घेतला होता.. याचा अभ्यास आता सत्ताधाऱ्यांनी करणे गरजेचे आहे


तस पाहायला गेलं तर स्व .वसंतदादा पाटील हे देशाचे नेते ..राजकारणी... दिवंगत राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.. कदाचित त्यावेळेला ते स्वतः पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते दादांनी नाकारलं.. त्यामुळे गांधी घराण्याची मर्जी नेहमी दादांच्या घराण्यावर निश्चितपणांना राहिली आहे आणि आहे ...
मात्र सांगलीच्या राजकारणा मधून जसे स्वर्गीय वसंतदादा होते तसेच त्यांचे सहकारी बलराम जाकड ,माधवराव सिंधिया, त्याच काळातील जगजीवन राम, प्रणव मुखर्जी गुलाम नबी आझाद असे बरेच नेते मंडळी दिल्ली दरबारी आपले वजन राखत स्व.वसंतदादांच्या बरोबरीने होते


मात्र झालं काय... त्यांच्या वारसांनी दिल्लीच राजकारण केलं... आणि आमच्या वसंतदादांच्या वारसांनी सांगलीपुरतं मर्यादित राहून राजकारण केलं... जसं मध्यवर्ती बँक, शेतकरी बँक, शेतकरी सहकारी कारखाना, तत्कालीन नगरपालिका, आणि परत ईतर संस्था या फक्त आणि फक्त आपल्याकडेच असाव्यात याच्यावर  घरातलाच माणूस चेअरमन, अथवा अध्यक्ष, अथवा प्रमुख असावा या परिस्थतीमुळे मुळे यांना दिल्लीला जाणं झालं नाही...

दिल्लीच राजकारणात सांगलीकरांना पूर्ण देशाचं राजकारण करण्याची संधी असताना फक्त "सांगलीच्या" राजकारणात ही मंडळी अडकून राहिल्यामुळे त्यांना दिल्लीच राजकारण जमलं नाही तसं पाहायला गेलं जगजीवन राव यांची मुलगी, मीरा कुमारी,  जगदीश पायलट त्यांचा मुलगा सचिन पायलट, माधवराव शिंदे यांचे मुलगा तसेच अनेक दिग्गज वरच्या फळीतल्या मुलांनी केंद्रातील राजकारण केले... आणि देशावर राज्य केलं आणि आमच्या सांगलीच्या दादांच्या वारसांनी फक्त सांगली. सांगली. सांगलीच केल्यामुळे सांगलीमध्ये ही काँग्रेसची अवस्था झाली...

कोणत्याही पक्षातला कार्यकर्ता मला एखाद पद मिळेल अशा अपेक्षेने प्रामाणिकपणाने काम करत असतो  अपेक्षेने काम करत असतो परंतु त्याची कदर होणे आज तरी गरजेचे आहे ...

सांगलीची काँग्रेस फक्त सांगली काँग्रेस सेवा दलामुळे टिकून आहे की काय, असा प्रश्न या पाच सात वर्षात दिसत होता... सांगली काँग्रेस कमिटी मध्ये कोणीही नेता फिरकायला सुद्धा तयार नव्हता .. मोजके हातावर  बोटावर मोजणे इतकेच गल्लीबोळातील कार्यकर्ते येत असत..त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला तर त्यांना मदत सुद्धा काही नेत्यांनी केलेली नाही ...हे सत्य आहे ...
असो ...
ज्यांनी या गेल्या पाच सात वर्षात  त्या नेत्यानी सक्रिय रहात काँग्रेसचे मोर्चे, काँग्रेस त्यासाठी काम करत पक्षास पुनर्जीवन देण्यासाठी जे केलेले आहे ते सर्व सांगलीकरांना ज्ञात आहे...


       *आता विधानसभेचा विषय येत आहे.... 

   पक्ष कोणताही असो प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षा असतातच... परंतु  आपल्याकडे सर्व असावे , माझ्या घरातच पाहिजे असा काही मेसेज जाऊ नये ...अशा अनुषंगाने सत्ताधार्यानी ,  ,खासदार विशालदादा पाटलांनी, बाळासाहेब उर्फ विश्वजीत कदम, जयश्री ताई पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, यांनी एकत्र  बसून विचार करणे गरजेचे आहे ..

आम्ही  वारंवार  म्हणतो की, काँग्रेसला शत्रू कोणी नाही.. फक्त काँग्रेसला काँग्रेसवालेच अंतर्गतपणे पाडू शकतात ...त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा मोठ्या मनाने विचार करून योग्य व्यक्तीस विधानसभा उमेदवारी सर्व सहमतीने आणि मोठ मन दाखवलं तर निश्चितपणाने विधानसभा मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यास हरकत नाही.... नाहीतर विरोधकाना तेवढ.च पाहिजे .. आपल्या  आपल्या हाता तोंडाशी आलेला घास  निघून जाईल ... याच देखील भान ठेवणं आज सत्ताधिश व काँग्रेसवाल्यांना ठेवण्याची गरजेचे आहे असं मला वाटतं... 

त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची कदर करण्याची भावना आता मोठ्या मनाने काँग्रेसवासीयांनी करून योग्य निर्णय  घेतला तर योग्य होणार आहे 

बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीमध्ये जिंकणे म्हणजे हरखुन जाण्याची परिस्थिती आज तर सांगली परिसरामध्ये नाही.... या गोष्टीचा माननीय बाळासाहेब; विश्वजीत कदम, खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील यांनी  एकत्रितपणे करून सांगलीसाठी योग्य  उमेदवार देण्याची देण्याची व्यवस्था करावी... तरच विजय काँग्रेसचा निश्चित होईल... जर गट तट झाले आणि त्याच्यामधून काहीतरी वेगळे निष्पन्न झालं तर सांगलीचा उमेदवार धोक्यात आहे ....

आपला :सलीम नदाफ ;संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई; सांगली.
8830247886

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.