ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
पत्रकार जयवंत पिसाळ यांनी समाजकार्यात ठसा उमठवला ज्येष्ठ नागरिक संघाने केला गौरव
पत्रकारिता करत सामाजिक व सार्वजनिक कार्यातून पत्रकार जयवंत पिसाळ यांनी कर्तृत्वाने जिल्हाभर ओळख निर्माण केली. केवळ बातमीदारी न करता समाजाला बोलकं केल दुर्लक्षीतांना न्याय दिला. त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन जीवन गौरव पुरस्कार मिळाला हा भुईज गावासह आम्हा सर्व जेष्ठांचा सन्मान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे (फेसकॉम) प्रतिनिधी प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी केले.भुईंज ता. वाई येथे जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने साप्ताहिक कृष्णातीरने नुकतेच पत्रकार जयवंत पिसाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले याबद्दल जेष्ठ नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे (फेसकॉम) प्रतिनिधी प्रा. विठ्ठलराव जाधवराव बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त पोलीस आयुक्त बाजीराव भोसले होते. यावेळी बोलताना विठ्ठलराव जाधवराव पुढे म्हणाले की भुईज गावाला विविध अंगी वारसा व वैदिप्यमान परंपरा आहेत या जपण्याची जवाबदारी सर्वांच घटकांची आहे या गावातील सर्व पत्रकार अतिशय चांगल्या प्रकारे परिसराला न्याय देण्याचा प्रयल करतात जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ यांनी गेली ३० वर्षात पत्रकारीता करीत सार्वजनिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत ज्ञानसत्र कृष्णाकाठावरील व्याख्यानमाला सुरू करून ती जपत आहेत तर सतत सर्वच क्षेत्रात त्यांनी केलेले काम आर्दशवत असल्याने मिळालेला पुरस्कार हा योग्य मानसाला मिळाला व जेष्ठांनीहि योग्य माणसाचे कौतुक केले यामुळे या सत्काराची उंची वाढते असे हि ते यावेळी म्हणाले.यावेळी सेवा निवृत्त पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी उपस्थित जेष्ठांना मार्गदर्शन करत व्यक्त व्हा मैत्री जपा व संघटित रहा असा सल्ला देवून लागेल ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यकमास जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे, सदाशिव भोसले, सचिव अशोक चव्हाण, ओमप्रकाश उर्फ रमेशआबा भोसले, रमेश भोसले पाटील, जनार्दन खरे, आनंदराव तांबे, भालचंद्र गाडे यांच्यासह सर्व जेष्ठ नागरीक व भुईंज प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
7709504356