लोकसंदेश न्यूज नेटवर्क
अर्थसंकल्पात गरीब वर्ग, युवक, शेतकरी आणि महिला यांच्या विकास आणि प्रगतीला प्राधान्य, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया; शहर विकासाचाही विचार....
सांगली दि.२३: केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांच्या विकासाचा आणि प्रगतीला पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केल्या आहेत. सहकार क्षेत्रासाठी देशव्यापी व्यापक धोरणही प्रथमच जाहीर झाले आहे. त्याचबरोबर कर सवलतीचा निर्णय मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे,असे मनोगत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या भूमिकेनुसारच देशातील गरीब वर्ग, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवूनच यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यामध्ये महिलांना विकासाच्या अनेक संधी देणाऱ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर युवकांना रोजगार आणि कार्यकौशल्य विकसित विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतीमालाच्या किमतीबाबतही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल यासारख्या तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीला सरकार यापुढे प्राधान्य देणार असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे.
ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्याआहेत. त्यामध्ये सौर ऊर्जेला सहाजिकच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
शहर विकासासाठीही वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या असून देशातील शंभर शहरे निवडून तेथील नागरी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. रोजगार निर्मितीवर या अर्थसंकल्पात मोठा भर देण्यात आला आहे तरुणांच्या हाताला काम हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ८० कोटी गरिबांसाठीची असलेली मोफत धान्य योजना आहे यापुढेही पाच वर्षे सुरू राहणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षप्रणित एनडीएने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचे पाऊल या अर्थसंकल्पात टाकण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महागाईला आळा, विकासदरात आघाडी, परकीय गुंतवणुकीला प्राधान्य, बँकिंग व उद्योग क्षेत्र मजबूत करणे, सहकार क्षेत्राला ताकद देणे अशा सर्व आघाड्यावर काम करीत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे ,असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.