आरोपी 👆
ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
वाई एम.आय.डी.सी मधील गोळीबार प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर
वाई येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात २४ जून रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय निकम यास वाईच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने पंढरपूर येथून ताब्यात घेतले होते. तदनंतर संशयितास मे. न्यायालयामध्ये दिनांक २ जुलै रोजी हजर केले असता त्यास न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पूर्व वैमनस्यातून वाई औद्योगिक वसाहतीत सोमवार (दि.२४ जून ) रोजी एकावर गोळीबार झाला होता. या घटनेत अमन इस्माईल सय्यद (वय२४ रा बोपर्डी ता. वाई सद्या रा महंमदवाडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला होता. त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार संशयित आरोपींवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित अक्षय निकम हा फरारी झाला होता. त्याला पळून जाण्यास व गुन्ह्यात मदत करणाऱ्या चार संशयीतांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.संशयित आरोपी नामे अक्षय निकम यास शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी पुन्हा मे. न्यायालयासमोर हजर केले असता , मे. न्यायालयाने संशयित आरोपीस न्यायालीयन कोठडी सुनावली आहे , सदर संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्रथमेश बनकर यांनी मे. न्यायालयात बाजू मांडली.
बातमी जाहिरातीसाठी संपर्क
7709504356
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा