, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

पुल, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल

     सांगली, दि. 27, : सध्या सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे व चांदोली व कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरीता होत असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पाण्यामुळे नदीवरील वाहतुकीस असलेले पुल, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरून कोणी प्रवास करून कोणत्याही जीवीतास धोका पोहचू नये या करीता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये वाहतूक मार्गात दि. 28 जुलै 2024 रोजीचे 00.01 ते दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.

       
  
अ.क्र.

पोलीस ठाणे

बंद झालेला रस्ता पुल

पर्यायी मार्ग

1.___________________________________

सांगली शहर

कर्नाळ चौकी ते शिवशंभु चौक जाणारा रोड

कॉलेज कॉर्नर ते बायपास मार्गे

२..___________________________________

सांगली ग्रामीण

समडोळी ते कोथळी बंधारा

सांगली मार्गे कोथळी

.___________________________________

कसबे डिग्रज ते मौजे डिग्रज बंधारा

पर्याय मार्ग नाही

.___________________________________

दुधगाव ते खोची बंधारा

दुधगांव ते आष्टा मार्गे
.___________________________________

मौजे डिग्रज ते कर्नाळ रस्ता

पर्याय मार्ग नाही

.___________________________________

मौजे डिग्रज ते सांगली पुल

कसबे डिग्रज ते सांगली

.___________________________________

दुधगांव ते माळवाडी रोड

पर्याय मार्ग नाही
.___________________________________

माळवाडी ते कुंभोज रोड

पर्याय मार्ग नाही

.___________________________________

कसबे डिग्रज ते मौज डिग्रज नविन पुल

पर्यायी मार्ग नाही

.___________________________________

हरिपूर ते कोथळी जाणारा पूल

अंकली फाटा मार्गे

.___________________________________

3.

मिरज ग्रामीण

म्हैशाळ ते कनवाड बंधारा -45 फुट (बंधारा पातळी)

म्हैशाळ ते कागवाड मार्गे - कनवाड

4.__________________________________

इस्लामपूर

बोरगाव ते रेटरे हर्णाक्ष बंधारा

बोरगाव ते रेटरे कृष्णा नदी पुलावरून

5.___________________________________

कुरळप

ऐतवडे खुर्द ते निलेवाडी पुल

ऐतवडे खुर्द ते चिकुर्डेमार्ग
.___________________________________

कुंडलवाडी ते चावरे बंधारा

पर्याय नाही
.___________________________________

ऐतवडे खुर्द ते देवर्डे रस्ता बंद

कुरळप मार्गे देवर्डे

.___________________________________

कनेगावं ते भरतवाडी रस्ता

पर्याय मार्ग नाही

.___________________________________

कुंडलवाडी ते तांदूळवाडी रस्ता

कुंडलवाडी ते यलुरवाडी मार्गे


6..___________________________________

कोकरूड

कोकरूड ते रेठरे बंधारा

कोकरूड ते मलकापूर मार्ग

चरण ते सोनोली पुल

कोकरूड ते मलकापूर मार्ग

आरळा ते शित्तुर पुल

कोकरूड ते मलकापूर मार्ग

बिळाशी ते भेडसगांव पुल

कोकरूड ते मलकापूर मार्ग

7..___________________________________

शिराळा

सांगाव ते सुरूड रस्ता

सांगाव ते कोकरूड मार्गे

कांदे ते मांगले पुल

मांगले ते चिकुर्डे मार्गे

8..___________________________________

आष्टा

शिरगांव ते नागठाणे बंधारा

(बंधाऱ्यावर 14 फुट पाणी आहे)

शिरगांव ते नागठाणे बुर्ली मार्गे

9..___________________________________

भिलवडी

नागठाणे बंधारा

नदी पात्रातील पुल वाहतूक नाही

.___________________________________

खटाव ते नांद्रे पुल

खटाव ते वसगडे मार्गे

भिलवडी ते आमणापुर पुल

भिलवडी पाचवा मैल मार्गे

10..___________________________________

तासगाव

राजापुर पुल बंद


शिरगाव मार्गे

राजापुर ते बोरगांव पुल

तुरर्ची ढवळी मार्गे

11..___________________________________

पलूस

आंदळी ते चिखलगोठण पुल बंद

आंदळी ते वाझर

आमणापुर ते औदुंबर पुल बंद

खंडोबाचीवाडी मार्गे

बुर्ली ते आमणापूर जाणारा रस्ता

रामानंदनगर मार्गे

12..___________________________________

विटा

राजापूर ते कमळापूर पुल

राजापूर ते बलवडी मार्ग

.___________________________________

         या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 131 प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केले आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.