पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित *‘कर्मवीरायण’* हा सिनेमा प्रदर्शित... त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार केला आहे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित *‘कर्मवीरायण’* हा सिनेमा प्रदर्शित... त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार केला आहे



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

काल पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित *‘कर्मवीरायण’* हा सिनेमा पाहिला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करून, बहुजन समाजाच्या सर्व जाती जमातीच्या गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

*स्वावलंबन, श्रम प्रतिष्ठा, स्वाभिमान व स्वातंत्र्य ह्या मूल्यांचे ते पुरस्करते होते*.

ह्या चित्रपटामध्ये अनेक ऐतिहासिक महान व्यक्तींच्या व्यक्तीरेखा जिवंत होऊन अनुभवयास मिळतात. *छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, महात्मा गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गाडगे महाराज, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, धनंजयराव गाडगीळ* वगैरे.

खेदाची गोष्ट ही की ह्या प्रेरणादायी अप्रतिम कलाकृतीला पुण्या सारख्या ठिकाणी फक्त चारच चित्रपटगृह मिळाले. सरकारने ह्या चित्रपटाला कर मुक्त केले नाही. मीडिया व समीक्षकांनी हेतू पूर्वक दुर्लक्ष केले.

सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा.

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे                   अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स                    9881495518

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई / सांगली