आपत्ती परिस्थिती मुळे सांगली जिल्हाधिकारी यांचे.जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्याचे परिपत्रक...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आपत्ती परिस्थिती मुळे सांगली जिल्हाधिकारी यांचे.जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्याचे परिपत्रक...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क..

आपत्ती परिस्थिती मुळे सांगली जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्याचे परिपत्रक...

ज्या अर्थी, उक्त नमुद अ. क्र. ४ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्हयातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरीता अथवा जिल्ह‌यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार याना सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी याना प्रदान करण्यात आले आहेत.


ज्या अर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी है आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. तसेच संदर्भ क्र.2 मध्ये नमूद शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ल्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

आणि ज्याअर्थी हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५/०७/२०२४ व दिनांक २६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्हयाला अतिवृष्टीचा रेड अॅलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे, तसेच सांगली जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व जिल्हयातील कृष्णा नदीवरील आयर्विन पूलाच्या ठीकाणची पाणी पातळी ३३.०५ फुट झालेने कृष्णानदीचे पाणी इशारा पातळी ओलांडणेची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सांगली जिल्हयातील मिरज, पलूस, वाळवा, व शिराळा तालुक्यातील शाळांना सुट्टी देणेबाबत कळविले आहे. सांगली जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक वि‌द्यालये, आश्रमशाळा, व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्वे वि‌द्यार्थीना दिनांक-२६ जुलै २०१४ रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. असे माझे मत झाले आहे.
त्या अर्थी मी डॉ. राजा दयानिधी, भा.प्र.से. जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली मला वरील वाचले क्र.१, २, व ४ अन्वये प्राप्त अधिकारान्वय जिल्हयातील मिरज, (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह) वाळवा, पलूस व शिराव तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक वि‌द्यालये, आश्रमशाळा, व सर्व शाळा


त्या अर्थी मी डॉ. राजा दयानिधी, भा.प्र.से. जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली मला वरील क्र.१, २, व ४ अन्वये प्राप्त अधिकारान्वये सांगली जिल्ह्यातील मिरज, (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह) वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक वि‌द्यालये, आश्रमशाळा, व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्व वि‌द्यार्थीना दिनाक २८ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे, तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत । विद्यालयात महावि‌द्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणेचे आहे...

सदर आदेशाची अमंलबजावणी शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद, सांगली यांनी
करणेची आहे.

मा.डॉ. राजा दयानिधी, (भाप्रसे)
जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली,