प्रसन्न चेह-यांने हृदयरोगाने मरणाच्या सिमेवर असणा-या रुग्णांचे प्राण खेचून आणणारे डॉकटर रियाज मुजावर यांचे नाव सर्वमुखी झाले आहे.... त्यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रसन्न चेह-यांने हृदयरोगाने मरणाच्या सिमेवर असणा-या रुग्णांचे प्राण खेचून आणणारे डॉकटर रियाज मुजावर यांचे नाव सर्वमुखी झाले आहे.... त्यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...



   लोकसंदेश न्यूज मीडिया 

वैद्यकीय नगरी मिरज .डॉकटर सर विल्यम वान्लेस यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.डॉकटर वान्लेस यांच्या कार्याचा विचाराचा वारसा घेऊन अनेक धन्वंतरी वैद्यकीय सेवेतून अनेकांना रोगमुक्त करून चांगले आरोग्य देत आहेत. अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत खेचून आणत आहेत.यात आजच्या पिढिचे अगदी तरुणवयात आपल्या बुध्दीचे चातर्य व अद्यावत कौशल्य आत्मसात करून प्रसन्न चेह-यांने हृदयरोगाने मरणाच्या सिमेवर असणा-या रुग्णांचे प्राण खेचून आणणारे डॉकटर रियाज मुजावर यांचे नाव सर्वमुखी झाले आहे.

मिरज लक्ष्मी मार्केटला जुन्या पिढीतील विश्वनाथ लकडे,ताराचंद शहा,शंकरराव चिकोडे ,शरद पाटील यांचा एकत्र येण्याचे व चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे उमर मुजावर यांचे उमर क्लॉथ स्टोअर रोज ही मंडळी येथे जमून नियोजित आंदोलनांना दिशा द्यायचे .मिरजेचे दोन आमदार या केंद्रातूनच निवडून आले.उमर मुजावर यांचे सुपुत्र असणारे रियाज लहानपणी चार वर्षं बोलताच येत नव्हते.पुढे त्याला इंग्रजी शाळेत घातले .पण ते त्याला झेपणार नाही असे समजून मराठी माध्यमात घातले.सुगम क्लासेसच्या अविनाश चौगुले सरांच्याकडे शिकले.शिक्षणाची गोडी लागलेल्या रियाजने आपल्या बुध्दीचे पंख पसरायला व यशाच्या आकाशात झेपावायला सुरवात केली आणि १२वीला अशी गुणवत्ता मिळवली की पुण्या मुंबईल फ्रीसिटमधून मेडिकलला प्रवेश मिळेल .पण गावावरच्या प्रेमापोटी रियाज यांनी मिरज मेडिकलला प्रवेश घेतला .तिथेही ते आघाडीवरच राहिले.एम. बी बी. एस .नंतर.मिरज वान्लेस हॉस्पिटल मध्ये त्यांनी डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड(DNB) लाप्रवेश घेतला.तिथे गुणवत्तेत सर्वोत्तम गुण मिळाल्याने श्री सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्स येथे कार्डिऑलॉजीस्ट DNB ला प्रवेश घेतला. या कोर्स सोबत फेलोशीप इन इंटरव्हेनल कार्डिओलॉजी पूर्ण केली. जिज्ञासू व जिगरबाज माणसाला यशाची शिखरे साद घालतात.श्री सत्य साई इन्स्टिट्युटने त्यांना अमेरिकेतील क्लिव्हलॅंड हॉस्पिटलला ऑब्झर्व्हरशीपसाठी पाठवले.



जगातलं अद्यावत तंत्रज्ञान अगदी कमीवयात आत्मसात करणारे डॉकटर रियाज हे पहिलेच धन्वंतरी असावेत.
एवढं शिक्षण दरम्यान त्यांचा जीवनात आलेल्या कुशाग्र बुध्ीच्या धन्वंतरी असणा-या व सुविध्य पत्नी शबाना .खरं तर कुठल्याही मेट्रो सिटीत ते स्थिराऊ शकले असते. पण वडिल उमर साहेब व माताजी नसिमा यांच्या संस्काराने दिलेली मातीची ओढ व ज्यांच्या सानिध्यात वाढलो त्यांची सेवा हे ब्रीद असणारे डॉकटर रियाज.२०१५ ला मिरज येथे आर्यन हार्टकेअरची स्थापना केली.व अल्पावधीत त्यांच्या कर्तृत्वाने वैद्यकीय विश्वात वेगळा ठसा उमटवला.लहान मुलांच्या हृदयाचे छिद्र बरे करण्याची अत्यंत क्लिष्ट व धोकादायक असणारी शस्त्रक्रिया अगदी कमी वेळेत लिलया तेकरतात व रुग्णाला जीवनदान देतात.शल्यविशारद म्हणून हृदयाच्या सगळ्याच शस्त्रक्रिया ते मनापासून व आपल्या अद्यावत ज्ञानाचा पुरेपूर वापर करतात. व रुग्णांना वाचवतात.अनेक हृदय बंद पडलेल्या लिांचे हृदय डॉकटरांनी सुरु केले आहे. त्यंच्या .शस्त्रक्रयेच्या अनेक अचंबित करणा-या वार्ता आपण मिडिया व सोशल मिडियावर वाचत असतो.या सगळ्यातून वेळ काढून डॉकटर अनाथ ,वृध्द यांना सेवा देतात.मदतीचा हात उभा करतात.पत्रकार ,साहित्यिक ,कलाकार यांची मोफत आरोग्य तपासणी करतात.एका देवदूताच्या भूमिकेत डॉकटर रियाज प्रसन्न मुखाने स्वागत करतात .
त्यांना बागकामाची आवड आहे. घराभोवती त्यांनी छान बाग फुलवली आहे.सायकलिंग तर त्यांचा आवडीचा विषय प्रत्येक वर्षी ते भव्य अशास्पर्धांचे आयोजन करतात.रॅली काढतात. अशा उपक्रमांना ते आमंत्रण देतातच शिवाय आवर्जून आधून मधून त्यांचा फोन येतो .हाज हून आल्यानंतर त्यांनी पवित्र जल व खजूर पाठवली.
  प्रसन्न मुखाने प्रत्येकाच्या हृदयाचेी काळजी घेत मिरजकरांचे हृदय काबीज करणारे डॉकटर रियाज.अगदी तरुण वयात त्यांच्या कर्तबगारीने प्रभावित होऊन मिरजकरांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला.आज रोटरी क्लबचेवते सेक्रेटरी आहेत.
अशा या हृदयराज तरुण  मित्राचा दिनांक १६ जुलै वाढदिवस.त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा...

संपादक:
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.