ओंकार पोतदार - सातारा जिल्हाप्रमुख
जेष्ठ महिलेच्या पिशवीमधुन रोख रक्कम ५० हजार रुपये चोरी करणा-या चोरट्यास वाई तपासपथकाने २४ तासात रोख रक्कम ५० हजार रुपयांसह घेतले ताब्यात
जेष्ठ महिला नामे मंदा अशोक खंडागळे रा गणपती आळी वाई या दिनांक २८/०६/२०२४ रोजी त्यांचे पतीचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी साठवलेले ५० हजार रुपये घेऊन केळकर हॉस्पीटल चावडी चौक येथे जात असतांना अज्ञात चोरटयाने महिलेची कापडी पिशवी खालुन कशानेतरी कापुन अज्ञात चोरट्याने ५० हजार रोख रक्कम रुपये चोरुन नेहलेबाबत वाई पोलीस ठाणेस माहिती प्राप्त झाल्याने वाई पोलीस ठाणे येथे सदरबाबत भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर अज्ञात चोरट्याचा शोध घेत असतांना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्याच्या खास गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, चावडी चौक येथे जेष्ठ महिलेची चोरी करणार संशयित इसम हा छत्रपती शिवाजी चौक वाई येथे येणार आहे. अशी बातमी प्राप्त होताच वाई पोलीस ठाणेकडील तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना सदरच्या संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्यानंतर तपासपथकाने छत्रपती शिवाजी चौक वाई येथे सापळा रचुन संशयित इसमास ताब्यात घेऊनत्यास त्याचे नाव विचारले असता बिलाल बरसेअली जाफरी रा कल्याण ठाणे असे सांगितले त्यास चौकशीकामी पोलीस ठाण्यास आणुन त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने दिनांक २८/०६/२०२४ रोजी चावडी चौक येथे झालेल्या चोरीची कबुली दिल्याने, त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे खिशात रोख रक्कम ५० हजार रुपये मिळुन आले. ते गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेले आहेत सदरच्या वाई पोलीस ठाण्याच्या कारवाई बाबत जनसामान्यातुन पोलीस प्रशासनाविषयी उल्लेखनीय कामगिरीबाबत भावना व्यक्त होत आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा अजित जाधव, पो. कॉ राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत, शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा
7709504356 बातमीसाठी संपर्क