महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणखीन एक मार्ग...महाराष्ट्रात बनणार 126 किमी लांबीचा नवा महामार्ग....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणखीन एक मार्ग...महाराष्ट्रात बनणार 126 किमी लांबीचा नवा महामार्ग....



लोकसंदेश उरण प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणखीन एक मार्ग...
महाराष्ट्रात बनणार 126 किमी
लांबीचा नवा महामार्ग....

राज्यात महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापैकी शक्तीपीठ महामार्ग , समृद्धी महामार्ग यांचा समावेश होतो. आता महाराष्ट्रात 126 किमी लांबीचा आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. अलिबाग – विरार कॉरिडॉर असे मार्गाचे नाव असून यामुळे पाच तासांचे आंतर केवळ दीड तासात पूर्ण करता येणार आहे. यासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून यामुळे अलिबाग ते विरार हा प्रवास खूपच कमी वेळेत होणार आहे.

कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते . विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किमी लांबीचा हा कॉरिडॉर दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

         प्रकल्पात या जिल्ह्यांचा समावेश

हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. एमएमआरचा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एमएसआरडीसीने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.


        हुडकोकडून 22,250 कोटींचे कर्ज

बहुचर्चित अलिबाग – विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाबाबतही २६ जूनला महत्त्वाचा निर्णय झाला. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी महाराष्ट्र राज्य शासन हमी घेणार आहे. म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1,130 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.आतापर्यंत या प्रकल्पासाठी 215.80 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2,341 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

विरार-अलिबाग प्रकल्प तयार करून, एमएमआरमध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी एमएमआरचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्प जोडले जाणार आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, एमएमआरडी च्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे शक्य होईल.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ रायगड.

______________________________________________________________________
बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत...

"इस्टेट 99 इंडिया" संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचे खात्रीशीर व कायदेशीर व्यवहार करणारी एकमेव कंपनी... आपल्या कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी कृपया खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा...
99 39 39 22 99

               
                * उद्योगाची नवी संधी..*

"इस्टेट 99 इंडिया" कंपनी होतकरू तरुणांना कमी भांडवलामध्ये आपल्या जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी उद्योगांची नवीन संधी निर्माण करून देत आहे ..आपण कंपनीचे फ्रंचाईसी घेऊन छोट्या गुंतवणुकीतून मोठा उद्योग करू शकता ...अधिक माहितीसाठी संपर्क करा..90119 81511 व
8830247886

______________________________________________________________________