अण्णासाहेब पाटील महामंडळाचे MD यांच्याद्वारे जाणीवपूर्वक 61 कर्मचारी कपात केल्याने तीव्र नाराज

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे MD यांच्याद्वारे जाणीवपूर्वक 61 कर्मचारी कपात केल्याने तीव्र नाराज

 



ओंकार पोतदार -सातारा जिल्हा प्रमुख

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे MD यांच्याद्वारे जाणीवपूर्वक 61 कर्मचारी कपात केल्याने तीव्र नाराज


राज्यातील मराठा समाजामध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (M.D.) श्री. मंगेश मोहिते यांनी जाणीवपूर्वक महामंडळाचे तब्बल ६१ कर्मचा- यांची कोणतीही कल्पना न देता कपात केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करुन त्यांचे विरोधात आज रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला उद्योजक बनविण्याकरीता ज्या विविध योजना आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे फार मोठे योगदान असल्याचा नरेंद्र पाटील यांनी उल्लेख केला. आज राज्यामध्ये जवळपास ९२,४९५ लाभार्थी संख्या असुन, त्यांना ७२०१ कोटीपर्यन्त बँकेकडुन कर्ज पुरवठा करण्यात आला असुन, त्या कर्जापोटी व्याज स्वरुपात जवळपास ७८० कोटीचा व्याज परतावा महामंडळाकडुन करण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदमध्ये दिली. हे महामंडळ पुर्णताः ऑनलाईन पध्दतीने काम करीत असुन, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना कर्ज न देता व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्याना बँकेकडून कागदपत्राची संपूर्ण पाहणी व तपासणी करुनच बँकामार्फत कर्ज दिले जाते व त्या कर्जावरील १२% पर्यन्त व्याज हे महामंडळमार्फत दिले जाते. सदरील ही संपुर्ण प्रक्रिया करण्याकरीता महामंडळामध्ये विभाग, जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर कंत्राटी स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी योग्य पध्दतीने काम करुन घेणे हे प्रशासकीय प्रमुख म्हणुन व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश मोहिते यांची जबाबदारी असल्याची त्यांनी सांगितले. परंतु त्यांचेकडुन या सर्व बाबींकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बाब त्यांनी आज निदर्शनास आणुन दिली. तसेच नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, माझी या महामंडळवर अध्यक्ष म्हणुन नेमणुक होण्यापुर्वी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडुन कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व दिरंगाई आढळुन येत होती, लाभार्थ्यांना योग्य वागणुक मिळत नव्हती, जाणीवपूर्वक लाभार्थ्यांचे प्रकरण प्रलंबित ठेवली जात होती, वेळेवर व्याज परतावा अदा होत नव्हता, लाभार्थ्यांची दिशाभुल केली जात होती, लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळत नव्हती, विभागीय समन्वयक यांचेकडून आलेल्या ई-मेल ला वेळेत उत्तर दिली जात नव्हते, रिकन्सलेशन्स प्रक्रिया होत नव्हती, योग्य वेळेत ऑडिट होत नव्हते, संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची कित्येक महिने कार्यवाही होत नव्हती, बँकांसोबत समन्वय होत नव्हते, ज्या बँकांकडुन कर्ज दिले जात नाही अशा बँकांसोबत चर्चा होत नव्हती, लाभार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीकोनातुन मदत होत नव्हती इ. गोष्टी होत असताना कर्मचाऱ्यांवर योग्य पध्दतीने प्रशासकीय अंकुश ठेवणे ही जबाबदारी मुख्यताः महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची असताना त्यांचेकडुन या सर्वबाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. म्हणुन जिल्हास्तरावर योग्यरित्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहीजे, लाभार्थ्यांना व्याज परतावा त्वरीत मिळाला पाहिजे, तसेच तालुका, गांव स्तरापर्यन्त गरजु मराठा नागरिकांपर्यन्त योजना पोहचली पाहिजे व त्यांना योजनेमार्फत उद्योजक होण्यासाठी मदत व्हावी, यासाठी महामंडळामार्फत जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर अधिकच्या कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु व्यवस्थापकीय संचालक यांच्या कामातील अनियमितता संचालक मंडळाच्या बैठकीत उघड केल्यामुळे व मराठा समाजात राज्य सरकारच्या विरोधात हेतुपुरस्सर असंतोष निर्माण करण्यासाठी जाणीवपुर्वक ६१ कर्मचाऱ्यांची कोणतेही स्पष्ट कारण न देता अचानकपणे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विश्वासात न घेता कपात केल्याचे सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची कामे वेळेवर न होणे, व्याज परतावा वेळेवर न मिळणे अशा अनेक प्रकारच्या दिरंगाई होणाऱ्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश मोहिते यांची तातडीने इतर विभागामध्ये शासनामार्फत बदली करुन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यक्षम, अभ्यासु अशा अधिकाऱ्याची नेमणुक करुन, कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजु करुन घेण्याची या पत्रकार परिषेमध्ये मागणी केलेली आहे. त्यासाठी ते स्वताः राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व शेवटी त्यांनी महाराष्ट्र राज्यभर दौरे करुन लवकरच १ लाख मराठा उद्योजकांचा टप्पा गाठणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

7709504356

लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा