कोयत्याचा धाक दाखवुन तसेच एअर गनने मारहाण करुन एका इसमास जबरदस्तीने लूटणा-या सातारा जिल्ह्यातुन तडीपार आरोपींना वाई पोलीसांनी केले जेरबंद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोयत्याचा धाक दाखवुन तसेच एअर गनने मारहाण करुन एका इसमास जबरदस्तीने लूटणा-या सातारा जिल्ह्यातुन तडीपार आरोपींना वाई पोलीसांनी केले जेरबंद

 


ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख

कोयत्याचा धाक दाखवुन तसेच एअर गनने मारहाण करुन एका इसमास जबरदस्तीने लूटणा-या सातारा जिल्ह्यातुन तडीपार आरोपींना वाई पोलीसांनी केले जेरबंद 

        वाई गणपती घाटाजवळ रोडच्या कडेस व्यवसाय करणा-या लक्ष्मीकांत रंगराव जाधव रा वाढेफाटा यांस तडीपार इसम अक्षय गोरख माळी व वसंत ताराचंद घाडगे यांनी कोयत्याचा बाक दाखवुन व एअर गनने मारहाण करुन त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने दहशत माजवण्याच्या हेतुने घेऊन गेलेबाबत तक्रार पोलीस ठाणेस प्राप्त होताच वरील दोन तडीपास इसमांवर वाई पोलीस ठाणे गु.र.नं 199/2024 भा.द.वि कलम 394,34 सह म.पो.का.क 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा करणारे इसम हे गुरेबाजार झोपडपट्टीमध्ये लपुन बसलेबाबत वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्याच्या खास बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी वाई पोलीस ठाण्याचे तपासपथकातील अंमलदार यांना पाठवुन आरोपीना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्याने त्यानुसार दोन्ही तडीपार इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम, एअर गन, कोयता जप्त करण्यात आला असुन, त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील तडीपार इसम हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाई शहरात प्रचंड दहशत असणा-या या तडीपार इसमांना जेरबंद केल्याने जनसामान्यातुन पोलीस प्रशासनाविषयी उल्लेखनीय कामगिरीबाबत भावना व्यक्त होत आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक विपीन चव्हाण, सुधीर वाळुंज, पो. कॉ राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत, शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.


लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

7709504356