ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर वाई एमआयडीसीत गोळीबार
• जखमी झालेला तरुण रुग्णालयात दाखल
• घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली भेट
• वाई पोलीस आणि एलसीबीची टीम घटनास्थळी
वाई येथील एमआयडीसी च्या चांदणी चौकात सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या भाडंणातून एकावर फायरिंग झाल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या युवकास तात्काळ वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी पोहचले तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपूर्वी वाई एमआयडीसी येथील चांदणी चौकात युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती, त्याप्रकरणी वाई पोलिसात गुन्हे ही दाखल झाले होते. त्याच गुन्ह्यातील संशयित असलेल्या एकावर रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी वाई शहरात पसरली. गोळीबार करणारे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले. सातारा येथून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखा ही घटनास्थळी पोहचली. तसेच जखमी युवकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून घटनास्थळी पोलीस फायरिंग झालेल्या ठिकाणी काही धागेदोरे हाती मिळतात का तसेच गोळीबार कोणी केला याचा शोध घेत आहेत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
7709504356