आढावा बैठकीस उशिरा येणाऱ्या अधिकारी यांना आकारला ५००/- दंड ... महापालिका अति,आयुक्त सतर्क
धोकादायक इमारती, नाले सफाई ,होर्डिंग बाबत कोणतेही प्रकारे हयगय ,कसूर करण्याचा नाही ,कारवाई अटळ... रविकांत अडसूळ प्र आयुक्त तथा अति आयुक्त
मा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी प्रत्येक सोमवारी सर्व विभागाकडील विषयावर आढावा बैठक घेण्यासाठी नियोजन केले आहे, तशा सूचना या पूर्वी दिलेला आहेत त्याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
आज दि २७/५/२०२४ रोजी मनपा साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विनापरवाना उशिरा आणि गैर हजर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विनानोटिस ५००/-दंड आकारला आहे. या पुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.दंड विना नोटीस आकारणी करण्यासाठी सहा आयुक्त आस्थापना विभाग विनायक शिंदे यांना प्रभारी आयुक्त तथा अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या वेळी आदेश दिले आहेत.
आढावा बैठकीत मान्सून पूर्व नाले सफाई , बांधकाम विभाग , आरोग्य विभाग , नगररचना विभागाकडील विषयावर चर्चा करण्यात आली आहे,
बेकायदेशीर होर्डिंग कारवाई बाबत आढावा घेतला ३१ होर्डिंग पैकी आज अखेर ५ होर्डिंग काढण्यात आले असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले त्या वर पुढील तीन दिवसात अन्य विभागाची मदत घेऊन सत्वर कारवाई पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती बाबत देखील चर्चा करण्यात आली, यावेळी शासन निर्णय आणि कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करणे आवश्यक आहे, सहा आयुक्त यांनी त्या बाबत खबरदारी घ्यावी, धोकादायक इमारत आणि बांधकाम पडण्याची कारवाई या पूर्वी मान्यता घेतलेल्या इमारती बाबत सत्वर चालू करावी अशी सूचना प्र.आयुक्त तथा अति आयुक्त रवुकांत अडसूळ यांनी दिले आहे, या कामी कोणत्याही परिस्थितीत हयगय अगर कसूर सहन केला जाणार नाही, या बाबत मा आयुक्त लवकरच आढावा घेणार आहेत, त्या पूर्वी दोन तीन दिवसात धोकादायक इमारती बाबत मान्सून पूर्व कारवाई करण्याची आहे .
धोकादायक इमारतीवर नागरिकांना *सूचना फलक* लवकरात लवकर लावणे बाबत या वेळी पुन्हा सूचना दिल्या आहेत, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करावयाच्या उपाययोजना सत्वर करून घेण्याचा आहेत ,यावर बैठकीत चर्चा होऊन सूचना दिल्या आहेत,
यावेळी उप आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर ,आणि खाते प्रमुख, अधिकारी उपस्थितीत होते .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.