लोकसंदेश न्यूज नेटवर्क
संभाजी ब्रिगेड वैचारिकता व समाज हित जपणारा पक्ष.... नितीन बानुगडे
गेली 35 वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडकर यांनी तळागाळातील वंचित लोकांना एकत्र करून नेहमीच समाज हित जपण्याचा प्रयत्न केला. देशाच्या व जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यसत्ता महत्वाची आहे. म्हणून 2016 पासून संभाजी ब्रिगेडने राजकीय भूमिका अत्यंत ताकतीने निभावली आहे. जाती- जाती भांडणे लावून राजकीय फायदा घेणाऱ्यांपासून आपण सावध झालं पाहिजे. लोकशाहीला घातक असलेल्या भाजपाला सत्तेपासून रोखायला हवं. असं मत प्रा शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले गेले दहा वर्ष सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. तरुणांच्या हाताला काम नाही. सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून क्रीडा क्षेत्रात, आयटी क्षेत्रात नवनवीन उद्योग निर्माण झालेले नाहीत. विमानतळाचा प्रश्न मिटलेला नाही. फक्त सेटलमेंटचं राजकारण चालू आहे. अश्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासारख्या नवीन तरुणाला निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचा इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने चंद्रहार पाटील यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करेल.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बजरंग पाटील,राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, समाजवादी पार्टीचे प्रताप होगाडे, नितीन मिरजकर,संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखा पाटील, कार्याध्यक्ष विजयमाला कदम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी जाधव, सचिव महेश भंडारे, जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष संदीप पवार, महिला सचिव ललिता घाडगे, जिल्हा प्रवक्ता पवन कदम, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र भोसले, कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष उमेश पवार, तासगाव तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे, मिरज तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा अध्यक्ष कायदा विभाग अडवोकेट फिरोज खान मुबारक तांबोळी, जिल्हाध्यक्ष कायदा विभाग महिला एडवोकेट अर्चना उबाळे, युवती अध्यक्ष हेमलता मदने, सांगली शहराध्यक्ष योगेश पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्ना जमादार, महानगराध्यक्ष नितीन पवार, महिला शहर अध्यक्षा भारती पाटील, शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार, शहर संघटक विजय लांडगे, पश्चिम शहर अध्यक्ष फक्रुद्दीन भालदार ,सुरेश कनशेट्टी, अभिषेक पाटील, अमर शिंदे, राकेश रावळ,दीपक शिंदे भरत बेंगाळे, आशा भोसले, नंदकुमार बगाडे, राजेंद्र जाधव, दीपक शिंदे, दीपक चव्हाण, रियाज इनामदार, रशीद शेख, तोफिक शेख, मेहबूब मुल्ला, हसीब भोकरे, फिरोज जमादार ,जावीद मेकर, सलीम बारगीर, मुनी नेपारी, व संभाजी ब्रिगेडचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.