ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
महिला डॉक्टर सांभाळणार वाई 'आयएमए'ची कमान !
नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ.
इंडियन मेडिकल असोसिएशन वाई ही डॉक्टरांची संघटना सामाजिक कामात अग्रेसर असते. यावर्षी या संस्थेत एक नवा इतिहास रचला जातोय. जुन्या कार्यकारिणीचा काळ संपूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी वाई आय एम ए ही संस्था वाईतील काही ज्येष्ठ महिला डॉक्टर सांभाळणार आहेत. संपूर्ण देशातल्या आय एम ए च्या शाखांसाठी एक नवा वस्तूपाठच घालून दिला जातोय. आज वाई मध्ये या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे. डॉ. मंगला अहिवळे यांची पुढील दोन वर्षांसाठी वाई आय एम ए च्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे.इतर पदाधिकारी उपाध्यक्षा डॉ. मेधा घोटवडेकर,सचिव डॉ. लता पाटील, कोषाध्यक्ष डॉ. स्वाती देशपांडे तर सदस्य म्हणून डॉ. उल्का पोळ आणि डॉ. उल्का कदम यांची निवड करण्यात आलेली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क मुंबई /सातारा
7709504356