लोकसंदेश न्यूज नेटवर्क
अखेर जिल्हा पोलीस, सांगली हँग ऑन कॅफे, सांगलीच्या चालकास अटक करीत ॲक्शन मोडवर...
काही दिवसापूर्वी बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा हा १०० फुटी रोड, सांगली येथील हँग ऑन कॅफेमध्ये घडलेला होता. यामध्ये काही संघटना उतरून या कॅफेची मोडतोड देखील केलेली होती, याबाबतीत पोलिसांनी गांभीर गांभीर्याने लक्ष देत या कॅफेचा चालक अनिकेत प्रताप घाडगे, रा. अशोक स्फुर्ती बंगला, रामकृष्ण परंमहंस सोसायटी, १०० फुटी रोड, सांगली याने त्याचे हँग ऑन कॅफेमध्ये अपराध करणेकरीता सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्यास दिसू नयेत याकरीता पडदे लावून गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून सहाय्य केले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यास या गुन्हयात आरोपी करण्यात आले असून त्यास गुन्हयाचे तपासकामी आज रोजी अटक करण्यात आली या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे
सर्व कॅफे हॉटेल व्यवसायिकाना
पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडून आवाहन..
करण्यात येते की, सांगली जिल्हयात अशा प्रकारे कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम, आडोसा निर्माण करून अपराध करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून याबाबत सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. अशा कॅफेमध्ये अवैध बांधकाम, आडोसा करण्यात येवू नये ,यासाठी महानगरपालीकेला कळविण्यात आले असून यासाठी आवश्यकतेप्रमाणे पोलीसांची मदत घेवुन अशा कॅफेची तपासणी करण्यात येत आहे.
कॅफेमध्ये अशाप्रकारचे गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आलेस नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस किंव्हा पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली. यांना
संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.