लोकसंदेश न्यूज नेटवर्क..
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची
वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन पदाधिकारी निवड संपन्न..
सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थां ची शिखर संस्था असलेल्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांची फेर निवड करण्यात आली नवीन कालावधी करता कार्याध्यक्षपदी श्री आर एस चोपडे यांची निवड करण्यात आली संस्थेचे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे सचिव श्री विनोद पाटोळे , खजिनदार श्री शशिकांत राजोबा ,उपाध्यक्ष श्री अरुण दांडेकर व श्री नितीन खाडीलकर, संघटक श्री वैभव गुरव सहसचिव श्री एस एन होर्तीकर व श्री शिवपुत्र आरबोळे यांची निवड करण्यात आली.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी श्री एम एस राजपूत सर आणि मिरज तालुका अध्यक्षपदी श्री प्रशांत चव्हाण यांची निवड करण्यात आली
या निवडी वेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. बी एस पाटील इस्लामपूर यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . मा. श्री सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतात संस्थाचलकांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आणि संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्या पाठीशी सदैव उभे राहू असे अभिवचन दिले
अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी नूतन कालावधी करता पदाधिकारी व संचालकांची सर्व संमतीने निवड केली महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन सांगली येथे यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व संस्थाचालक ,देणगीदार ,जाहिरातदार यांचे आभार मानले संस्थेच्या पुढील वाटचालीत संस्थेची स्ववास्तू निर्माण व्हावी आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले तसेच प्रत्येक तालुक्यात संस्थेचे कार्यकारणी तयार करून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संस्था या संघाच्या सभासद व्हाव्यात यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचे अभिवचन दिले
कार्याध्यक्ष श्री आर एस चोपडे यांनी शिक्षण संस्था समोरील सद्य काळातील अडचणी व त्यासाठी सर्व संस्थांनी संघटित होऊन एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले .नूतन सचिव श्री विनोद पाटोळे यांनी प्रत्येक महिन्यातून किमान एक तरी मीटिंग माननीय शिक्षणाधिकारी सो यांचे बरोबर आयोजित करून संस्थाचालकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी नियोजन करावे असे सुचित केले खजिनदार शशिकांत राजोबा यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल सर्वांचे प्रबोधन होण्यासाठी सर्व संस्थांचे एक परिसंवाद आयोजित करण्याबद्दल सुचित केले
या सर्वसाधारण सभेत संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद पाटोळे यांनी आभार मानले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.