ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
हॉटेलमध्ये एसी रूममध्ये राहिला अन् बिल न देता पळाला; जकातवाडीतील एकावर गुन्हा
हॉटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील एका हॉटेलात घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जकातवाडीच्या एकावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी चंद्रसेन धनंजय जाधव (रा. पोवईनाका सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पंकज गणपत बाबर (रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दि. १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली आहे. संशियत पंकज बाबर याने सांबरवाडी, ता. सातारा येथील एका हॉटेलमधील एसी खोली बुक केली होती. त्यावेळी त्याने खोली, जेवण आणि मद्याच्या बिलासाठी ३५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम हॉटेलच्या खात्यावर आनलाईन पाठविल्याचे सांगितले. तसेच पैसे गेल्याचा मेसेजही दाखविण्यात आला. त्यामुळे यावर विश्वास ठेवून त्याला हॉटेलात खोली दिली. तसेच राहिलेल्या कालावधीत आर्डरप्रमाणे जेवण आणि मद्य पुरविण्यात आले. मात्र, दि. १८ फेब्रुवारीला पहाटे तो कोणासह न सांगता आणि सुमारे ३२ हजार रुपयांचे बील न देता निघून गेला.तसेच आनलाईनचे पैसे हॉटेलच्या खात्यावरही जमा झाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हवालदार चव्हाण हे तपास करीत आहेत.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा
संपर्क - 7709504356