गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग सायन्स मध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा ..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग सायन्स मध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा ..


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग सायन्स मध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा ..

मिरज दि.१४: गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग सायन्स मध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.परिचारिका या २४ तास रुग्ण सेवा करतात. त्या देशाच्या कणा आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आर्थिक अडचणी येता कामा नयेत. स्व. गुलाबराव पाटील यांच्या जनकल्याणकारी कामाचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी गेली १९ वर्षे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग सायन्सच्या माध्यमातून आदर्श परिचारिका घडवण्याचे राष्ट्रीय कार्य आम्ही करत आहोत. जगातील सर्व परिचारिकांना संस्थेच्या शुभेच्छा असा संदेश संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी यानिमित्त दिला आहे. 

प्रारंभी दिपप्रज्वलन व सहकार तीर्थ माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील आणि आधुनिक नर्सिंग च्या शिल्पकार फ्लाॅरेन्स नाईंटींगल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जीएनएम नर्सिंगचे प्राचार्य विनय डोंगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना नर्सिंग काॅलेजची माहिती दिली प्राचार्य गायकवाड व सोनाली भोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
जीएनएम विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करुन स्वागत केले. 
यावेळी 'आमच्या परिचारिका -आमचे भविष्य - आरोग्य रक्षणाची आर्थिक ताकद' या जागतिक परिचारिका दिन २०२४ च्या थीमचे अनावरण करताना सोनाली भोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
निशा यादव, रुक्मिणी रुपनूर, निकीता घंके व श्रध्दा मोहिते या विद्यार्थ्यांनीनी  नर्सिंग इतिहास व योगदान या विषयावर  मनोगते मांडली. शौर्या राठोड यांनी आमच्या परिचारिका - आमचे भविष्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. 
फ्लॉरेन्स नाईंटींगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून हा दिवस साजरा केला. त्यानंतर बौध्दीक व वार्षिक क्रिडा स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. उपप्राचार्य शैलेंद्र मलप यांनी आभार मानले. सूत्रसंचालन इन्स्ट्रक्टर मोनिका रजपूत यांनी केले. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त अॅड. विरेंद्र पाटील व समन्वयक प्राचार्य सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी नर्सिंग काॅलेजचा सर्व स्टाफ, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.