ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
सातारा जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच आज, सोमवारी सांयकाळी सातारा शहरासह वाई तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसानच अधिक झाले. वाई मध्ये वाठार फाटा ते सुरुर रोड येथे वडाची झाडे पडली असुन वाहतूक खंडित झाली. वीजतारा तुटल्यानेही काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळं वाहने ओझर्डे मार्गे जोशिविहिर मार्गे वळवण्यात आली. बांधकाम विभाग वाई तर्फे रस्ता मोकळे करण्याचें काम उशिरा पर्यंत चालू होते.सकाळ पासून उन्हाची तीव्रता वाढलेली. दरम्यानच आभाळ भरुन आलेले. त्यामुळे अवकाळी पाऊस होणार अशी चिन्हे होती. मात्र, हा पाऊस काही भागातच पडला. वाई शहर परिसरात सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला मोठमोठे थेंब पडले. त्यानंतर पावसाने जोर धरला. जवळपास अर्धा तास शहर आणि परिसरात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल उडाली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वाई तालुक्यातील अनेक भागात सोमवारी सायंकाळीच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवर झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.
लोकसदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सातारा