ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
⭕खाकी वर्दीतील ओरिजनल सिंघम सपोनि रमेश गर्जे भुईंज पोलिस स्टेशन..
पोलिस खाते म्हटले की शिस्त आली; पण शिस्तीच्या खात्यातही एखादा संवेदनशील पोलिस अधिकारी असू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे . चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे महाराष्ट्र पोलिस दलाचे हे ब्रिदवाक्य असून ते सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. अशा या पोलिस दलात एक नॉनकॉण्ट्रिव्हर्सल निःस्वार्थी प्रामाणिक पोलिस अधिकारी म्हणून उदयास आलेले रमेश गर्जे यांच्या प्रवासाविषयी...
⭕सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद कामगिरी...
सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झाल्यानंतर श्री. गर्जे यांनी प्रामाणिक पोलिस अधिकारी अशी ओळख निर्माण केली. सर्व सामान्यांचा पोलिस म्हणून खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळवला. साधी राहणी उच्च विचारसरणी हे गर्जे यांच्या यशाचे गमक आहे. पोलिस खाते म्हटले की गुन्हे आलेच, दडपण आले हे सर्व असतांना सुद्धा त्यांनी मोठ मोठे गुन्हे सहज सोडविले. काही गुन्ह्यात तर प्रेशर असतांनाही ते डगमगले नाही. ज्यांनी गुन्हा केला त्याला माफी मिळाली नाही. गुन्हेगाराला त्यांनी कधी माफीही दिली नाही. सहज स्वभाव असल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत जरा हटके असल्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या हरणांना दमवण्याचे काम गर्जे यांनी केले. कायद्याची बूज राखून कर्तव्याप्रती अनेक नागरीकांच्या मनात वेगळी आपुलकी जिव्हाळा निर्माण केला आहे. परिस्थिती बिकट व गरजू कुटुंबीयांना गर्जे यांनी अनेक गरजूंना पदरमोड करून मदत केली आहे.
⭕कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश...
कायदा व सुव्यवस्था राबविताना गर्जे यांनी अवैध धंद्यांना चाप लावला तसेच भुईंज पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाची चमक दाखविली. याच काळात केवळ हाणामारी, चोरीचे गुन्हेच नव्हे तर दरोडे, लूटमारीचे गुन्हेही त्यांनी उघड केले. तालुक्यातील मटका, जुगार, गांजा या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या व्यवसायांवर सतत वक्रदृष्टी ठेवली. कोणताही दबाव झुगारणारा अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द दिसत आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने भुईंज पोलिस स्टेशन येथे आपला दबदबा निर्माण केला. श्री. गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने अनेक क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून बेधडक कारवाई केल्या आहेत. व अट्टल गुन्हेगारांना देखील अटक करण्याची कर्तबगारी केली आहे..
⭕सुताशिवाय गर्जे यांनीं गाठला स्वर्ग...
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रमेश गर्जे यांचा महत्त्वाचा पुढाकार. अनेक गुन्ह्यामध्ये थंड डोक्याचे गुन्हेगार कुठलाच पुरावा मागे सोडत नाहीत. अशा गुन्ह्यांचा तपास करतांना पोलिस यंत्रणेचा खऱ्या अर्थाने कस लागतो. सुताने स्वर्ग गाठावा एव्हढाही पुरावा जेंव्हा घटनास्थळी सापडत नाही. त्यावेळी भुईंज पोलिसांनी आपले कर्तव्य पणाला लावले.
⭕सर्व सामान्यांना हवाहवासा वाटणारा पोलिस अधिकारी...
पोलिस निरीक्षकांची केबिन सर्व सामान्य जनतेसाठी नेहमी खुली असते. अनेक प्रकरणं सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेकांनी त्यांना आपलेसे केले आहे. गुन्हेगारांना शासन व सज्जनांचे रक्षण हेच पोलिसांचे काम असल्याचे गर्जे यांच्या खाकी वर्दीतून दिसून येते.
⭕मैत्रीसाठी जीव लावणारा पोलिस अधिकारी...
मैत्री मध्ये लहान मोठा असा भेदभाव कोणीही करत नाही पण गर्जे यांच्या मैत्रीतून जेष्ठांचा आदर व सन्मान करणं हे संस्कारात आहे. पोलिस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील गर्जे नेहमी मैत्रीचे नाते जपत त्यांच्या सुख- दुःखात धावून जातात.
⭕मोर्चे, आंदोलने, उपोषण, रमेश गर्जे लीडरशीप अधिकारी...
त्यांनी आपल्या हद्दीमध्ये राजकीय वातावरण कधी तापू दिलं नाही. जातिय सलोखा निर्माण करीत त्यांनी कधीही जातीधर्म, लहानमोठा गरिब श्रीमंत असा कोणताही भेदभाव. केला नाहीं. भांडण तंटे, जातियतेढ गटातटाचे भांडणे उद्भवली तर ते शातिरपणाने मिटवण्याचीही त्यांच्याकडे जादुई कांडी आहे. एखादी घटना घडली तरी फार शांततेत त्याला आवर घालने असे फार कमी लोकांना जमते त्यातले म्हणजे रमेश गर्जे.
⭕खाकीतल्या माणुसकीचा झरा...
जनतेच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे. मात्र बऱ्याचवेळी अनावश्यक पोलिसिंगमुळे | जनता आणि पोलिसांमधील दरी वाढत जाते! संघर्षाच्याही घटना घडतात. गर्जे साहेबांनी मात्र सुरुवातीपासूनच जनता आणि पोलिसांमध्ये दरी पडू नये, याची काळजी घेतली. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पद्धतीने कोणावर कारवाई होणार नाही, याचीही काळजी घेताना नेहमी दिसतात.. शांततापूर्वक काम करण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत, सौजन्य पूर्वक आणि शांतता पूर्व, त्याच्याकडे आलेल्या माणसाची वेदना, व्यथा, समजून घेऊन गुन्हेगारीला काबूत ठेऊन सोबतच सामाजिक दायित्व जोपासत अडचणीत सापडलेल्या बाधवांना मदतीसाठी आधाराचा हात पुढेच होता.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा
7709504356
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क