*ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख*
वाई तालुक्यातील जोशवीहिर उड्डाणपुलाखाली मधमाशांचे पोळे स्थानिक नागरीकांसाठी ठरत आहे धोक्याचे.
ग्रामीण भागात मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जेव्हा माणसापासून धोका असल्याची जाणीव होते, तेव्हाच मधमाशा त्याच्यावर हल्ला करतात. मधमाश्यांचे हल्ले टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी. मधमाश्यांच्या पोळ्यांना इजा पोहोचू देवू नये. तसेच हल्ला झाल्यास लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
जोश विहीर उड्डाणपुलाखाली मधमाशांनी भले मोठे पोळे तयार केले आहे गेल्या दोन महिन्यापासून हे पोळे तिथे वसलेले आहे आत्तापर्यंत बऱ्याच नागरिकांना मधमाशांनी चावा घेतलेला आहे. त्यातून कोणाच्या जीवितास हानी होऊ नये यासाठी त्वरित ते मधमाशांचे पोळे काढून टाकावे. अशी स्थानिक नागरिकांची संबंधित प्रशासनाला विनंती आहे. जोश विहीर मध्ये बरेच मंगल कार्यालय व बस स्थानक अशा बऱ्याच सोयी सुविधा असल्यामुळे सारखी नागरिकांची रहदारी चालू असते. त्यामुळे ते मधमाशांचे पोळे लवकरात लवकर हटवावे अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. यातून कोणाच्या जीवितास काही बरे वाईट घडले तर जबाबदार कोण असा स्थानिक नागरिकांनी इशारा केला आहे. जर लवकरात लवकर हे मधमाशांचे पोळे काढले गेले नाही तर स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको चा इशारा केला आहे.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा