उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन.



उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन...


      सांगली, दि. 10  : वाढते तापमान, हवेतील आद्रता यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनीही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.



     उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे.

•      तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे.

•      हलकी , पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत.

•      बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.

•      प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

•      उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी / व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा  किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा

•      शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करावा.

•      अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

•      गुरांना / पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.

•      घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

•      पंखे ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

•      कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

•      सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.


•      पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.

•      बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.

•      गरोदर माता, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

•      रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.

•      जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.

•      काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा.

•      टीन पत्र्याच्या छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे.

•      छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात.

                 काय करू नये

•      लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

•      दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

•      गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.




•      बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे.

•      उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.

•      उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये.

•      मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते.

•      उन्हात वाहने शक्यतो चालवू नये.


•      उष्माघाताचे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा.

•      ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.