पुणे जिल्हा प्रमुख - पारस मुथा
बिअर बार, रेस्टॉरंट रात्री दीड नंतरुन ही पुण्यातील सुरूच
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात भरधाव मोटार अपघातात एका संगणक अभियंता तरुण आणि तरुणीला जीव गमवावा लागला.अल्पवयीन मुलगा व त्याचे काही मित्र एका पब मध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून तिघेजणपबमधून अडीच वाजता पार्टी करुन घरी जात असताना हा अपघात झाला.मागील शनिवारी झालेले अपघातानंतर ताजे उदाहरण असतानाही या शनिवारी मध्यरात्री काही ठिकाणी दीड वाजल्यानंतरही बार मध्ये दारूची विक्री होताना दिसून येत आहे पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता पुण्यातील काही ठिकाणी दीड वाजल्यानंतरहूनही मध्ये रात्री पर्यंत बार सुरु असल्याचे दिसून येत आहे पुणे शहरातील बारला शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत रात्री दीड वाजल्यानंतर ही पुणे शहरातील अनेक बार आणि रेस्टॉरंट सुरू असल्याचे चित्र शनिवारी दिसून येते आहे. दारू पिण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे झुंजार ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समाेर अाले. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बार अाणि रेस्टाॅरंटकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत रात्री दीड नंतरुनही पुण्यातील अनेक बार आणि रेस्टॉरंट सुरू असली चित्र दिसून येत आहे. दारू पिण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे झुंजार ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समाेर अाले पुणे शहरात मध्यरात्रीपर्यंत बार आणि रेस्टॉरंटमध्ये बिनधास्त दारू विक्री केली जात आहे. याबाबत झुंजार च्या प्रतिनिधीने पुणे शहरातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा ते सात बार आणि रेस्टॉरंटची पाहणी केली. तेव्हा रात्री दीड नंतरुनही अनेक बारमध्ये बिनदिक्कत प्रवेश मिळत होता. तर काही बार-रेस्टॉरंटचे मुख्य दरवाजे बंद असले तरी इतर छुप्या दरवाजांतून प्रवेश दिला जात होता. ग्राहकांच्या दुचाकी, चारचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे हा व्यवसाय सुरू असूनही अशा बार आणि रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.